कलिना सेंट्रल लायब्ररी घोटाळाप्रकरणी छगन भुजबळांसह ६ जणांवर आरोपपत्र दाखल
By Admin | Updated: March 28, 2016 14:28 IST2016-03-28T14:15:32+5:302016-03-28T14:28:39+5:30
कलिना सेंट्रल लायब्ररीप्रकरणी छगन भुजबळ व इतर सहा जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले.

कलिना सेंट्रल लायब्ररी घोटाळाप्रकरणी छगन भुजबळांसह ६ जणांवर आरोपपत्र दाखल
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणात अडकलेले राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासमोरील अडचणी आणखीन वाढल्या असून कलिना सेंट्रल लायब्ररीप्रकरणी भुजबळांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी विशेष न्यायालयाथ भुजबळ, त्यांचे सीए रवींद्र सावंत यांच्यासह इतर सहा जणांवर १७ हजार ४०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. कलिना विद्यापीठातील राज्य सरकारच्या सेंट्रल लायब्ररीप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
कलिना विद्यापीठाचा भूखंड हडप केल्याची केस गंभीर असून, एसीबीच्या म्हणण्यानुसार, संबंधित भूखंड मुंबई विद्यापीठाचा होता. मात्र, या भूखंडावर लायब्ररी बांधण्याचे कंत्राट खासगी विकासकाला देण्यात आले. यासाठी भुजबळ यांना मोठ्या रकमेची लाच देण्यात आली.
भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांच्या बेहिशेबी मालमत्तेची आणि भूखंड हडप केल्याची चौकशी करून, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या अंजली दमानिया आणि प्रीती मेनन यांनी जनहित याचिकेद्वारे केली होती.