छगन, समीर व पंकज भुजबळांविरोधात लाच लुचपत खात्याने दाखल केले आरोप पत्र
By Admin | Updated: February 24, 2016 16:28 IST2016-02-24T16:21:50+5:302016-02-24T16:28:31+5:30
माजी मंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह एकूण 16 जणांविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने मुंबईमध्ये विशेष सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे

छगन, समीर व पंकज भुजबळांविरोधात लाच लुचपत खात्याने दाखल केले आरोप पत्र
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - माजी मंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह एकूण 16 जणांविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने मुंबईमध्ये विशेष सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप असून, पाटबंधारा खात्याशी संंबंधित अनेक अधिका-यांवरही आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळ व पंकज भुजबऴ यांच्यावरही ठपका ठेवला असल्याने भुजबळ कुटुंबिय अडचणीत आले आहे.
अँटी करप्शन खात्याने आरोपपत्रामध्ये ज्या 17 जणांची आरोपी म्हणून नावे दिली आहेत, ती पुढीलप्रमाणे:
1. छगन भुजबळ, तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री
2. अरूण देवधर, तत्कालिन अधीक्षक अभियंता
3. माणिकलाल शहा, तत्कालिन मुख्य अभियंता
4. देवदत्त मराठे, तत्कालिन सचिव
5. दीपक देशपांडे, तत्कालिन सचिव
6. बिपिन संखे, मुख्य वास्तूशास्त्रज्ञ
7. अनिलकुमार गायकवाड, तत्कालिन कार्यकारी अभियंता
8. कृष्णा चमणकर, विकासक
9. प्रवीणा चमणकर, विकासक
10. प्रणिता चमणकर, विकासक
11. प्रसन्ना चमणकर, विकासक
12. पंकज भुजबळ
13. समीर भुजबळ
14. तन्वीर शेख, संचालक, नीश इन्फ्रा प्रा. लि.
15. इरन तन्वीर शेख, संचालक, ओरिजिन इन्फ्रा प्रा. लि.
16. संजय दिवाकर जोशी, संचालक, ओरिजिन इन्फ्रा प्रा. लि.
17. गीता संजय जोशी, संचालक, ओरिजिन इन्फ्रा प्रा. लि.