कोपर्डी बलात्कार प्रकरणी अखेर आरोपपत्र दाखल
By Admin | Updated: October 7, 2016 16:18 IST2016-10-07T16:18:56+5:302016-10-07T16:18:56+5:30
अहमदनगर जिल्हयातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आले.
कोपर्डी बलात्कार प्रकरणी अखेर आरोपपत्र दाखल
>ऑनलाइन लोकमत
कोपर्डी, दि. ७ - अहमदनगर जिल्हयातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी अखेर आज आरोपपत्र दाखल करण्यात आले. अहमदनगर सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या ४५० पानी आरोपपत्रात ३ आरोपींवर हत्या आणि बलात्काराचा गुन्हा लावण्यात आला आहे.
कोपर्डी येथील मुलीवर तीन नराधमांनी अमानुष बलात्कार केला. या विरोधात राज्यभरात मराठयांचे मूक मोर्चे काढण्यात येत असले तरी पोलिसांनी मात्र ८५ दिवस उलटले असतानाही दोषारोपपत्र न्यायालयामध्ये दाखल केले नव्हते. यावरू सर्व स्तरांत नाराजीचे वातावरण असतानाच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या २४ तासात दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल असे आश्वासन अकोला येथे बोलताना दिले.
९० दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर आरोपींना जामीन मिळण्याची दाट शक्यता असल्याने ९० दिवस होण्याआधी पोलिसांनी या प्रकरणाचे दोषारोपपत्र ताताडीने न्यायालयात सादर करावे या मागणीसाठी अकोला जिल्हयातील मराठा मूक मोर्चातील युवती आणि युवकांनी नेहरु पार्क चौक ते अशोक वाटीका रोडवर काळे कापड परिधान करून आणि हातात फलक धरुन मुख्यमंत्री आणि पोलिसांच्या हलगर्जी कारभाराचा निषेध केला.