व्हॉट्सअॅपवर पेपर फुटल्याचा आरोप
By Admin | Updated: November 14, 2014 01:58 IST2014-11-14T01:58:57+5:302014-11-14T01:58:57+5:30
व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून एक दिवस आधीच अभियांत्रिकेच्या प्रश्नपत्रिका विद्याथ्र्याना मिळत असल्याच्या वृत्ताने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली.

व्हॉट्सअॅपवर पेपर फुटल्याचा आरोप
नाशिक : व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून एक दिवस आधीच अभियांत्रिकेच्या प्रश्नपत्रिका विद्याथ्र्याना मिळत असल्याच्या वृत्ताने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली. पुणो विद्यापीठाने पेपर फुटल्याचा इन्कार केला आहे तर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
काही विद्याथ्र्याकडून पेपर फुटल्याचा आरोप केला जात असल्याने एकच गोंधळ उडाला. मात्र सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाने हे वृत्त पूर्णपणो चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे. अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम सत्रच्या परीक्षा 3 नोव्हेंबरपासून सुरू आहेत. आतार्पयत तीन विषयांचे पेपर झाले असून, तिन्ही पेपरच्या प्रश्नपत्रिका आदल्या दिवशीच व्हॉट्स अॅपवर शेअर करण्यात आल्याचा आरोप काही विद्याथ्र्यानी केला. विद्यापीठात याबाबत मोठे रॅकेट सक्रीय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ज्या विद्याथ्र्याकडून पेपर फुटल्याचे दावे केले जात आहेत. त्यांनी आमच्याकडे प्रबळ पुरावे असल्याचे सांगितल्याने विद्यापीठावरच संशयाची सुई वळली आहे. व्हॉट्स अॅपवर शेअर केलेल्या प्रश्नपत्रिकांवर विद्यापीठाचा कोड नसल्याचे बोलले जात असून, हा सर्व प्रकार नियोजनबद्ध असल्याचाही आरोप केला जात आहे. (प्रतिनिधी)
नाशिकमधील पेपरफूट प्रकरणाची माहिती मी घेतली आहे. फुटलेला पेपर आणि मूळ पेपर यात फरक असल्याचे तेथील अधिका:यांनी मला सांगितले. मी दोन्ही पेपर मागविले आहेत. सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
- विनोद तावडे, शिक्षण मंत्री