जान्हवी गडकरविरोधात दोन महिन्यांत आरोपपत्र

By Admin | Updated: August 11, 2015 02:21 IST2015-08-11T02:21:10+5:302015-08-11T02:21:10+5:30

पूर्व मुक्त मार्गावर दारू पिऊन भरधाव गाडी चालवत दोघांचा बळी घेणारी विधी सल्लागार जान्हवी गडकरविरुद्ध सोमवारी कुर्ला महानगर दंडाधिकारी न्यायालयात पोलिसांनी तब्बल ५६० पानी

In charge of Janhavi Gadkari, chargesheet in two months | जान्हवी गडकरविरोधात दोन महिन्यांत आरोपपत्र

जान्हवी गडकरविरोधात दोन महिन्यांत आरोपपत्र

मुंबई : पूर्व मुक्त मार्गावर दारू पिऊन भरधाव गाडी चालवत दोघांचा बळी घेणारी विधी सल्लागार जान्हवी गडकरविरुद्ध सोमवारी कुर्ला महानगर दंडाधिकारी न्यायालयात पोलिसांनी तब्बल ५६० पानी आरोपपत्र दाखल केले. दोन महिन्यांपूर्वी याच दिवशी ही दुर्घटना घडली होती.
या अपघातप्रकरणी गडकरविरोधात सदोष मनुष्यवध, निष्काळजीपणे व दारू पिऊन भरधाव गाडी चालवणे यांसह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी जान्हवी घटनेआधी ज्या बारमध्ये बसली होती, तेथील सीसीटीव्ही चित्रण व तिने बारमध्ये के्रडिट कार्डद्वारे पैसे भरल्याचा तपशील आरोपपत्राला जोडला आहे.
तसेच या अपघातात बळी गेलेल्या दोघांचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांचा व अपघात झाल्यानंतर गाडीचा पंचनामा करणाऱ्या पोलिसांचा जबाबही आरोपपत्रात आहे. याव्यतिरिक्त ही घटना घडण्याआधी गडकरसोबत असलेल्या तिच्या मित्रांचे जबाब आहेत. अपघात झाला तेव्हा गडकर दारू प्यायली होती, याचा फॉरेन्सिक पुरावा आरोपपत्रात आहे.
हे आरोपपत्र दाखल झाले तेव्हा गडकर आणि अपघातातील पीडितांचे नातेवाईक न्यायालयात होते. यावरील पुढील सुनावणी १२ आॅगस्टला होणार आहे. आरोपपत्र दाखल झाल्याने हे प्रकरण आता खटला चालवण्यासाठी सत्र न्यायालयात वर्ग करण्यात येईल. त्यानंतर तेथे न्यायालय सरकारी पक्ष साक्षीदारांची यादी सादर करण्यास सांगून खटल्याचे कामकाज सुरू होईल. पोलिसांनी दोन महिन्यांत याचे आरोपपत्र दाखल केल्याने आता याचा खटला किती दिवसांत सुरू होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हा अपघात ९ जून २०१५ रोजी पूर्व दु्रतगती मार्गावर झाला. गडकर तिच्या आॅडी कारमधून या मार्गावरून भरधाव वेगाने गाडी चालवत मार्गिकेच्या विरुद्ध दिशेने जात होती. त्या वेळी तेथून जाणाऱ्या टॅक्सीला तिने धडक दिली. या टॅक्सीत सहा जण होते. या अपघातात मोहम्मद अब्दुल सय्यद (५५) व मोहम्मद सलिम सबूवाला (५०) यांचा बळी गेला.

Web Title: In charge of Janhavi Gadkari, chargesheet in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.