तृप्ती देसार्इंवर नाशकात चप्पलफेक

By Admin | Updated: May 27, 2016 05:59 IST2016-05-27T05:59:02+5:302016-05-27T05:59:02+5:30

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई गुरुवारी पुन्हा श्री कपालेश्वर महादेव मंदिरात आल्या खऱ्या; मात्र जमलेल्या शेकडो भाविकांनी कडाडून विरोध करून गर्भगृहात प्रवेश करण्यापासून रोखल्याने

Chappalpak in Nashik in Nashik | तृप्ती देसार्इंवर नाशकात चप्पलफेक

तृप्ती देसार्इंवर नाशकात चप्पलफेक

नाशिक : भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई गुरुवारी पुन्हा श्री कपालेश्वर महादेव मंदिरात आल्या खऱ्या; मात्र जमलेल्या शेकडो भाविकांनी कडाडून विरोध करून गर्भगृहात प्रवेश करण्यापासून रोखल्याने त्यांना ‘दूर’ दर्शनच करावे लागले. सभागृहातून दर्शन घेतल्यानंतर मंदिराबाहेर पडताच संतप्त जमावापैकी कोणीतरी देसाई यांना धक्काबुक्की केली तसेच त्यांच्यावर विटा व चपलांचा माराही करण्यात आला. पोलिसांनी त्यांना सुखरूपपणे मंदिराबाहेर काढले व पोलीस वाहनात बसवून नेले.

Web Title: Chappalpak in Nashik in Nashik