आजपासून ‘तेजस’च्या वेळेत बदल
By Admin | Updated: June 22, 2017 05:35 IST2017-06-22T05:35:43+5:302017-06-22T05:35:43+5:30
अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली मुंबई-करमळी तेजस एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

आजपासून ‘तेजस’च्या वेळेत बदल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली मुंबई-करमळी तेजस एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. करमळी येथून गुरुवारपासून ट्रेन क्रमांक २२१२० तेजस एक्स्प्रेस सकाळी ९ वाजता निघणार असून, मुंबईत १९.४५ वाजता पोहोचणार आहे. यापूर्वी करमळी येथून ७.३० वाजता करमळी-मुंबई अशी सेवा सुरू होती.
मान्सूनच्या धर्तीवर खबरदारीचा उपाय म्हणून वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तेजसच्या केवळ वेळेत बदल करण्यात आला आहे. मात्र एक्स्प्रेसच्या थांब्यात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. आठवड्याच्या दर मंगळवार, गुरुवार आणि रविवारी ती धावणार आहे. मान्सून काळात तेजस एक्स्प्रेस केवळ तीन दिवस धावणार आहे.