‘एसएससी’ परीक्षेच्या पद्धतीत होणार बदल

By Admin | Updated: December 28, 2014 00:37 IST2014-12-28T00:37:14+5:302014-12-28T00:37:14+5:30

आगामी काळात ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ (एसएससी) आपल्या परीक्षेच्या पद्धतीत बदल करू शकते. शनिवारी या बाबीचे संकेत कमिशनचे अध्यक्ष ए. भट्टाचार्य यांनी दिले.

Changes to SSC exams | ‘एसएससी’ परीक्षेच्या पद्धतीत होणार बदल

‘एसएससी’ परीक्षेच्या पद्धतीत होणार बदल

विद्यार्थ्यांशी संवाद : आयोगाचे अध्यक्ष भट्टाचार्य यांचे संकेत
नागपूर : आगामी काळात ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ (एसएससी) आपल्या परीक्षेच्या पद्धतीत बदल करू शकते. शनिवारी या बाबीचे संकेत कमिशनचे अध्यक्ष ए. भट्टाचार्य यांनी दिले.
शनिवारी ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ (एसएससी) चे डिपार्टमेंट आॅफ पर्सोनल अँड ट्रेनिंग व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पूर्व परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाच्या अंबाझरी रोडवरील गुरुनानक सभागृहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘एसएससी’चे अध्यक्ष ए. भट्टाचार्य होते. त्यांच्या सोबत ‘एसएससी’ च्या पश्चिम विभगाचे प्रादेशिक संचालक के. बी. जगताप, डिपार्टमेंट आॅफ पर्सोनल अँड ट्रेनिंगचे संचालक जे. वैद्यनाथन आणि सचिव मनीषा भटनागर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात ‘एसएससी’च्या चमू शिवाय विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, उपनिवासी जिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे आणि कोचिंग सेंटरचे संचालक डॉ. विकास जांभुळकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भट्टाचार्य यांनी नव्या बदलांच्या मागे असलेली संभाव्य कारणे स्पष्ट केली. एसएससीच्या परीक्षेत राज्यांच्या अनुशेषाला दूर करण्याच्या उद्देशानेही बदल होऊ शकतो. सध्या एसएससीच्या परीक्षात महाराष्ट्राची टक्केवारी कमी आहे. भट्टाचार्य यांच्या मते एसएससीतर्फे आयोजित परीक्षात महाराष्ट्राचे केवळ २ टक्केच विद्यार्थी सामील होत असल्यानेही टक्केवारी वाढविण्यात येणार आहे.
या दिशेने आणखी महत्त्वपूर्ण पावले उचलण्याचे संकेत भट्टाचार्य यांनी दिले.(प्रतिनिधी)
एकसारखी असावी प्रश्नपत्रिका
कार्यक्रमात प्रश्नोत्तराच्या सत्रात विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ‘एसएससी’च्या अधिकाऱ्यांना सांगितले की, आयोगाच्या परीक्षेत प्रश्न पत्रिकेचे वेगवेगळे संच असतात. चार संचात प्रश्नपत्रिका न ठेवता एकच संच असावा. परीक्षा देशभरात एकाच वेळी व्हावी. याचा फायदा विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षेपासून वंचित राहावे लागणार नाही.
शंकेचे केले निरसन
विद्यार्थ्यांच्या मनात ‘एसएससी’च्या परीक्षेबाबत असलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. ‘एसएससी’च्या डिपार्टमेंट आॅफ पर्सोनल अँड ट्रेनिंगचे संचालक जे. वैद्यनाथन यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, प्रत्येक वर्षी आयोगातर्फे विविध केंद्र सरकारी विभागात विविध पदांसाठी परीक्षांचे आयोजन करण्यात येते. जर विद्यार्थ्यांनी परीक्षेची पद्धती समजावून घेतल्यास त्यांना परीक्षा देण्यात कुठलीच अडचण येणार नाही. सचिव मनिषा भटनागर यांनी विद्यार्थ्यांबद्दल काय शक्यता आहेत हे स्पष्ट केले. सोबतच त्यांना मिळणाऱ्या सुविधांचीही माहिती दिली.

Web Title: Changes to SSC exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.