सावकारी कायद्यात बदल करणार
By Admin | Updated: April 1, 2016 01:35 IST2016-04-01T01:35:54+5:302016-04-01T01:35:54+5:30
खासगी सावकारी कायद्यात बदल करण्याचा सरकारचा विचार असल्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.

सावकारी कायद्यात बदल करणार
मुंबई : खासगी सावकारी कायद्यात बदल करण्याचा सरकारचा विचार असल्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.
‘खासगी सावकारी कायद्यातील कायदेशीर अडचणींमुळे कर्जमाफीची ही प्रक्रिया रखडली आहे. आतापर्यंत कायदेशीर अडचणींमुळे अजून १२१ कोटी रुपयांचे वाटप झालेले नाही. हे पैसे राज्य सरकारने राखीव ठेवले आहेत. नोंदणीकृत सावकारांना कजर्वाटपासाठी ठराविक भौगोलिक क्षेत्र म्हणजेच कार्यक्षेत्र निश्चित करुन दिले जाते. मात्र, काही ठिकाणी सावकारांनी त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले आहे, असे कजर्वाटप या कायदेशीर अडचणीत सापडले आहे. त्यासाठी राज्य सरकार सावकारीच्या कायद्यात बदल करणार आहे,’ असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)