पहिल्या तासानंतरच होणार आरक्षण तिकिटांमध्ये बदल

By Admin | Updated: April 7, 2015 04:35 IST2015-04-07T04:35:34+5:302015-04-07T04:35:34+5:30

आरक्षित तिकीटांतील बदलांचा प्रवाशांना आता एका तासानंतरच विचार करता येणार आहे. दलालांना चाप लावण्यासाठी रेल्वे बॉर्डाने आरक्षण तिकिटामधील पहिल्या तासांतील

Changes in reservation tickets that will be held only after the first hour | पहिल्या तासानंतरच होणार आरक्षण तिकिटांमध्ये बदल

पहिल्या तासानंतरच होणार आरक्षण तिकिटांमध्ये बदल

मुंबई : आरक्षित तिकीटांतील बदलांचा प्रवाशांना आता एका तासानंतरच विचार करता येणार आहे. दलालांना चाप लावण्यासाठी रेल्वे बॉर्डाने आरक्षण तिकिटामधील पहिल्या तासांतील बदलांवर निर्बंध लावण्याचा नवा निर्णय घेतला आहे. तिकीट रद्द न करता आरक्षित तिकिटांची तारिख पुढे ढकलण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. हा निर्णय देशभरातील रेल्वे विभागांना लागू होत आहे. दर दिवशी चार हजार तिकिटांच्या तारखेत बदल होत असल्याचे सांगण्यात आले.
रेल्वे तिकिटांचे आरक्षण केल्यावर तिकिटावरील तारीख न बदलताही तिकिट रद्द करण्याचा नियम
आहे. मात्र या नियमांची बऱ्याच प्रवाशांना माहीतीही नसल्याने त्याचा गैरफायदा दलाल घेत असल्याचे रेल्वेच्या निदर्शनास आले आहे. आरक्षित तिकिटांच्या तारखेनंतरची एखादी तारीख असलेली आरक्षणे सुरु होण्याच्या दिवशी सकाळी दलाल तिकिट खिडकीवर घेवून जातात आणि आरक्षण सुरु होताच एका वेगळ्या तारखेचे तिकिट देवून त्यात तारखेचा बदल करुन नविन तारखेच कन्फर्म तिकिट दलाल मिळवतात.
सुरुवातीच्या एका तासांत हा बदल करण्याचा नियम असल्याने तारीख टाकून तिकिट प्रक्रिया दलालांकडून त्वरीत केली जाते आणि कन्फर्म तिकिटही मिळविले जाते. दलालांकडून शोधण्यात आलेल्या याामुळे रेल्वेला मोठे नुकसान होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Changes in reservation tickets that will be held only after the first hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.