आयआयटीच्या वेळापत्रकात बदल
By Admin | Updated: June 27, 2015 02:13 IST2015-06-27T02:13:45+5:302015-06-27T02:13:45+5:30
आयआयटी आणि एनआयटीमधील इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून ही सुधारित प्रवेश प्रक्रिया २९ जूनपासून सुरू होणार आहे.

आयआयटीच्या वेळापत्रकात बदल
मुंबई : आयआयटी आणि एनआयटीमधील इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून ही सुधारित प्रवेश प्रक्रिया २९ जूनपासून सुरू होणार आहे.
दिल्लीच्या सीबीएसई बोर्डाच्या अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर आयआयटीच्या समितीने हा निर्णय घेतला आहे. बारावी परीक्षेच्या गुणांवर जेईई मेन्सचा रँक अवलंबून असतो. गुणांची आकडेवारी वेळेत उपलब्ध न करून दिल्यामुळे सीबीएसईला जेईई मेन्सचा रँक जाहीर करता आला नव्हता. त्यामुळे सर्व बोर्डांना २५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांची गुणपत्रिका उपलब्ध करून देण्याची सूचना बोर्डाने जारी केली होती. अशा विद्यार्थ्यांच्या जेईई प्रवेशाच्या बाबतीत सीबीएसई जबाबदार राहणार नाही, असेही बोर्डाने स्पष्ट केले होते. त्यानंतर गुरूवारी सायंकाळी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले.