प्रवास सवलतीसाठी कुटुंब व्याख्येत बदल
By Admin | Updated: June 4, 2015 04:37 IST2015-06-04T04:37:27+5:302015-06-04T04:37:27+5:30
शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या महाराष्ट्र दर्शन व स्वग्राम प्रवास सवलतीमध्ये सुधारणा करीत कुटुंबाच्या व्याख्येत बदल करण्याचा निर्णय वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.

प्रवास सवलतीसाठी कुटुंब व्याख्येत बदल
मुंबई : शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या महाराष्ट्र दर्शन व स्वग्राम प्रवास सवलतीमध्ये सुधारणा करीत कुटुंबाच्या व्याख्येत बदल करण्याचा निर्णय वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.
या पूर्वी महाराष्ट्र दर्शन रजा प्रवास सवलत योजनेमध्ये कुटुंबाच्या व्याख्येनुसार केवळ पती, पत्नी व दोन अपत्ये यांचाच समावेश होता. आता कुटुंबाच्या व्याख्येत सुधारणा करून पती - पत्नी व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या दोन अपत्यांशिवाय नातेवाइकांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नातेवाइकांमध्ये पुरुष कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आई-वडील तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेले अविवाहित भाऊ -बहीण यांचा समावेश केलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे विधवा महिला अधिकारी, कर्मचारी यांच्याबाबतीत सासू-सासरे यांचाही समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अविवाहित शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आई-वडील तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेल्या भाऊ किंवा बहीण यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या बदलामुळे कुटुंबाची व्याख्या अधिक व्यापक झाली असून, याचा फायदा मुख्यत्वे विधवा व अविवाहित महिला कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबून असणारे त्यांचे आई-वडील, अविवाहित भाऊ-बहीण यांना होणार आहे.