नववी, दहावी श्रेणी विषयात बदल होणार

By Admin | Updated: October 12, 2016 03:05 IST2016-10-12T03:05:16+5:302016-10-12T03:05:16+5:30

इयत्ता नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकविल्या जाणाऱ्या श्रेणीविषयात बदल करण्याच्या हालचाली शिक्षण विभागाने सुरू केल्या आहेत.

Changes in Class X, Class X category | नववी, दहावी श्रेणी विषयात बदल होणार

नववी, दहावी श्रेणी विषयात बदल होणार

पुणे : इयत्ता नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकविल्या जाणाऱ्या श्रेणीविषयात बदल करण्याच्या हालचाली शिक्षण विभागाने सुरू केल्या आहेत. शिक्षक, अधिकारी, शिक्षण उपसंचालकांकडे प्रश्नावलीच्या माध्यमातून आॅनलाइन पद्धतीने सर्वेक्षण करण्याचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काळात नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांचे श्रेणी विषय कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या व्यक्तिमत्त्व विकास, कार्यशिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन, शारीरिक शिक्षण व माहिती व संपर्क तंत्रज्ञान (आयसीटी) असे पाच
श्रेणीविषय शिकविले जातात. यामध्ये कार्यशिक्षण विषयांतर्गत चित्रकला, संगीत यांसारखे ३५ उपविषय आहेत; मात्र श्रेणीविषय बदलाबाबत शिक्षण आयुक्त धीरज कुमार यांच्या अध्यक्षेतेखाली गेल्या महिन्यात बैठकही घेण्यात आली होती. त्यात श्रेणीविषय बदलाबाबत सर्वेक्षण करण्याचे निश्चित करण्यात आले होते. शिक्षण विभागाने तयार केलेल्या प्रश्नावलीत सात प्रश्नांचा समावेश होता; मात्र शिक्षणक्षेत्रात याबाबत जागृती न झाल्याने शिक्षक, मुख्याध्यापक व नागरिकांकडून यासंदर्भातील फारशा प्रतिक्रिया नोंदविल्या गेल्या नाहीत. (प्रतिनिधी)

Web Title: Changes in Class X, Class X category