शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

सरकार बदलले, शिंदे-फडणवीस आले तरी एसटीच्या कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा वेतनाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 07:14 IST

एसटी महामंडळ आधी आर्थिक अडचणीत असताना, कोरोनामध्ये मोठे नुकसान सोसावे लागले,  त्यामुळे सरकारने मदत केल्यानंतरच कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात येते.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एसटीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांचे वेतन दर महिन्याला ७ तारखेला दिले जाते. चालक वाहक आणि यांत्रिकी कर्मचारी याना वेतन मिळाले आहे. मात्र, एसटीच्या प्रशासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत वेतन मिळाले नव्हते,  यामुळे वेतन सोमवार वा मंगळवारी मिळण्याची शक्यता आहे. 

एसटी महामंडळ आधी आर्थिक अडचणीत असताना, कोरोनामध्ये मोठे नुकसान सोसावे लागले,  त्यामुळे सरकारने मदत केल्यानंतरच कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात येते. कोरोनापूर्व काळात  दररोज एसटीचे ६५ लाख प्रवासी आणि २२ कोटींचे उत्पन्न होते, तरीही ३ कोटींची तूट होती. मात्र, कोरोना आणि संप यामुळे एसटीचा मोठा प्रवासीवर्ग दुरावला आहे. सद्यस्थितीमध्ये दररोज २८ कोटी रुपये उत्पन्नाची आवश्यकता असताना १३ कोटींची उत्पन्न मिळत आहे, तर प्रवासी संख्याही ३० लाखांवर आली आहे.  प्रशासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना वेतन देण्यासाठी २५ कोटींचा निधी नसल्याने वेतन रखडल्याचे सूत्रांनी सांगितले.  

११७ कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय चांगला आहे, पण महामंडळाला एका पैशाचीही मदत जाहीर झालेली नाही. दिवाळी भेट, महागाई भत्ता तत्काळ मिळणे गरजेचे असताना, त्यावर काहीही निर्णय झाला नाही. प्रशासकीय कर्मचारी व अधिकारी यांना वेळेवर वेतन न देणे हे निंदनीय आहे. - श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस.

टॅग्स :state transportएसटी