‘मानसिकता बदला, रस्त्यावर उतरा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2017 02:18 IST2017-05-12T02:18:17+5:302017-05-12T02:18:17+5:30

सरकार जाऊन अडीच वर्षे झाली, तरी आपली मानसिकता अजून सत्तेत असल्यासारखीच आहे. ही मानसिकता बदला आणि रस्त्यावर उतरून संघर्ष करा

'Change mentality, land on the road' | ‘मानसिकता बदला, रस्त्यावर उतरा’

‘मानसिकता बदला, रस्त्यावर उतरा’

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सरकार जाऊन अडीच वर्षे झाली, तरी आपली मानसिकता अजून सत्तेत असल्यासारखीच आहे. ही मानसिकता बदला आणि रस्त्यावर उतरून संघर्ष करा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. शरद पवार यांनी स्वपक्षीय मंडळींना कानपिचक्या दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलताना खा. पवार म्हणाले, सत्तेत सहभागी असूनही शिवसेना सरकारविरोधात संघर्ष करत आहे. भाजपाचे नेते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत; पण आपण सुखवस्तू झालो आहोत. १५ वर्षे आपण सत्तेत होतो. सरकार जाऊन अडीच वर्षे झाली; पण आपली मानसिकता अजून सत्तेत असल्यासारखीच आहे. ही मानसिकता आधी बदलावी लागेल. रस्त्यावर उतरून संघर्ष करा, कारण लोकांना आपल्याकडून अपेक्षा आहे. तसे केले तरच चित्र बदलू शकते, असेही पवार म्हणाले.

Web Title: 'Change mentality, land on the road'