शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’तील बदलामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार तब्बल दीड हजार कोटींचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 06:10 IST

मूळ आधार टक्केवारीत केंद्राकडून बदल; स्वाभिमानी शेतकरी संघटना कोर्टात जाणार

पुणे : केंद्र सरकारने उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराच्या (एफआरपी) मूळ आधार टक्केवारीत साडेनऊवरून १० टक्के असा बदल केला आहे. त्यामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकºयांना १ हजार ४६५ कोटी आणि देशपातळीवर साडेचार हजार कोटींचा फटका बसणार आहे. या निर्णयाविरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटना न्यायालयात जाणार आहे.यापूर्वी एफआरपी किंमत देताना ९.५ टक्केप्रमाणे साखर उतारा आधार घेण्यात येत होता. त्यानुसार २ हजार ५५० रुपये प्रतिटनप्रमाणे ऊस देय रक्कम निर्धारित केली जात होती. तसेच साडेनऊ टक्क्यांपुढील प्रत्येक वाढीव टक्क्यासाठी २७० रुपये प्रतिटनप्रमाणे ऊसदरात वाढ देण्यात येत होती. मात्र, आगामी हंगामासाठी १० टक्क्यांप्रमाणे उसातून साखर मिळेल, असे गृहीत धरले. त्यानुसार २७५० रुपये प्रतिटन दर निर्धारित केला आहे. ज्या शेतकºयांचा साडेअकरा टक्के साखर उतारा असेल, त्यांना ९.५ टक्क्यांप्रमाणे प्रतिटन ३ हजार ३२८ रुपये मिळाले असते. मात्र, १० टक्के हा नव्याने निर्धारित केलेल्या आधारानुसार ११.५ टक्के साखर उतारा मिळालेल्या ऊसउत्पादकांच्या हाती ३ हजार १६२ रुपये प्रतिटनप्रमाणे रक्कम मिळणार आहे. यात पुन्हा तोडणी वाहतूक खर्चात कपात होईल. या हंगामात राज्यात ९०० लाख टन ऊसाचे गाळप अपेक्षित आहे. शेतकºयांना १० टक्के साखर उताऱ्याप्रमाणे प्रति टन १६५ रुपयांचा फटका बसणार आहे.एका हाताने दिले, दुसऱ्या हाताने काढून घेतलेगत हंगामाकरिता २ हजार ५५० रुपये प्रतिटन असलेल्या उसाच्या आधारभूत किमतीमध्ये यंदा केंद्र सरकारने २०० रुपये प्रतिटनाने वाढ केली आहे. मात्र, त्याच वेळी साखर उताºयाच्या मूळ आधारभूत टक्केवारीत अर्धा टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे एका हाताने दिलेली वाढ दुसºया हाताने काढून घेत शेतकºयांची फसवणूक केल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते योगेश पांडे यांनी दिली.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने