सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

By Admin | Updated: November 18, 2015 02:18 IST2015-11-18T02:18:41+5:302015-11-18T02:18:41+5:30

राज्य शासनाने आज पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. पीयूष सिंग हे सामाजिक न्याय विभागाचे (पुणे) नवे आयुक्त असतील. आतापर्यंत ते राजीव गांधी जीवनदायी

CHANGE OF CHANGE OFFICERS | सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने आज पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. पीयूष सिंग हे सामाजिक न्याय विभागाचे (पुणे) नवे आयुक्त असतील. आतापर्यंत ते राजीव गांधी जीवनदायी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. बुलडाण्याचे जिल्हाधिकारी के.व्ही. कुरुंदकर यांची बदली राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे.
महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांच्यावर अविश्वास प्रस्ताव महापालिकेच्या सभागृहाने मंजूर केला होता. त्यांची बदली करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, त्यांना नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे. तसेच, औरंगाबादच्या नव्या महापालिका आयुक्तांची नियुक्तीही शासनाने आज केली नाही. एमआयडीसीमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी असलेले मिलिंद शंभरकर हे नाशिक जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: CHANGE OF CHANGE OFFICERS