तब्बल ८ महिन्यांपासून बदलापुरात पाणीगळती

By Admin | Updated: April 30, 2016 03:01 IST2016-04-30T03:01:10+5:302016-04-30T03:01:10+5:30

राज्यात पाणी टंचाइचे तीव्र संकट असतांना बदलापुरात मात्र, ८ महिन्यांपासून फुटलेली जलवाहिनी दुरूस्तच केलेली नाही.

Change from 8 months to Waterfall | तब्बल ८ महिन्यांपासून बदलापुरात पाणीगळती

तब्बल ८ महिन्यांपासून बदलापुरात पाणीगळती

बदलापूर : राज्यात पाणी टंचाइचे तीव्र संकट असतांना बदलापुरात मात्र, ८ महिन्यांपासून फुटलेली जलवाहिनी दुरूस्तच केलेली नाही. जीवन प्राधिकरणाचे दुर्लक्ष होत असल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया
जात आहे. जीवन प्राधिकरणच्या वालिवली गावात जाणारी जलवाहिनी फुटली असून त्यातून दररोज हजारो लीटर शुद्ध पाणी गटारात वाहून जात आहे.
ग्रामस्थांनी याबाबत वारंवार जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे तक्र ार करूनही त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. येथे सकाळी ५ वाजता पाणी येते ते साडे सात पर्यंत असते. त्यामुळे सुमारे अडीच तास हे पाणी वाया जात आहे. तर बेलवली भागात रस्त्याचे काम सुरु असतांना तिथेही जलवाहिनी फुटली असून ती दुरु स्त नकेल्याने त्यातूनही हजारो लीटर पाणी वाहून जात आहे.
एकीकडे पाणी कमी आहे म्हणून शहरात पाणी कपात सुरु आहे तर दुसरीकडे जीवन प्राधिकरणच्या अनागोंदी कारभारामुळे पाणी फुकट जात आहे. याबात नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Change from 8 months to Waterfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.