चंदू चव्हाण आज धुळ्यात येणार

By Admin | Updated: March 11, 2017 00:53 IST2017-03-11T00:53:44+5:302017-03-11T00:53:44+5:30

पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप मायदेशी परतलेले तालुक्यातील बोरविहीर येथील जवान चंदू चव्हाण शनिवारी सकाळी १० वाजता शहरात दाखल होणार आहेत. मिरवणुकीने त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.

Chandu Chavan arrives in Dhule today | चंदू चव्हाण आज धुळ्यात येणार

चंदू चव्हाण आज धुळ्यात येणार

धुळे : पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप मायदेशी परतलेले तालुक्यातील बोरविहीर येथील जवान चंदू चव्हाण शनिवारी सकाळी १० वाजता शहरात दाखल होणार आहेत. मिरवणुकीने त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हेही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजपाचे महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी दिली. जवान चंदू चव्हाण यांचे सकाळी नगावबारी येथे आगमन होईल. जवान चंदू चव्हाण २९ सप्टेंबर २०१६ रोजी चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. डॉ. भामरे यांनी सातत्याने यासंदर्भात पाठपुरावा चालविला होता. त्यास यश मिळून २१ जानेवारीला अमृतसर येथील वाघा बॉर्डर येथे चव्हाण यांना भारताच्या स्वाधीन करण्यात आले. स्वत: डॉ. भामरे या वेळी उपस्थित होते. त्यानंतर सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर त्यांचे धुळे तालुक्यातील बोरविहीर येथे प्रथमच आगमन होत आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Chandu Chavan arrives in Dhule today