शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

Chandrayaan-2 : चांद्रयान २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर सतीश धवन अंतराळ केंद्रात चंद्रोत्सव साजरा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 19:18 IST

गेल्या अनेक दिवसांपासून अहोरात्र झटून भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या ''चांद्रयान २ '' या यानाला घेऊन प्रक्षेपक पृथ्वीच्या कक्षेकडे झेपावले.

ठळक मुद्देपृथ्वीच्या कक्षेत यान झेपावताच इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केला जल्लोष यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या जोरावर चंद्राच्या कक्षेत जाणार चांद्रयान १ या मोहिमेच्या यशानंतर चांद्रयान २ मोहीमेसाठी २००८ पासून इस्रोची तयारी

निनाद देशमुख- श्रीहरीकोटा : वेळ दुपारी २ वाजून ४३ मिनिटांची. पाच, चार, तीन, दोन, एक शून्य ही उलटी गणती संपताच जीएसएलव्ही मार्क ३ या प्रक्षेपकाचे इंजिन सुरु झाले. अन काही क्षणात गेल्या अनेक दिवसांपासून अहोरात्र झटून भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या ''चांद्रयान २ '' या यानाला घेऊन प्रक्षेपक पृथ्वीच्या कक्षेकडे झेपावले. प्रत्येक क्षणाला वर जाणाऱ्या यानाला पाहून शास्त्रज्ञांनी आपला श्वास रोखून धरला होता. थोड्याच वेळात यानाचे बूस्टर वेगळे झाले, अन चांद्रयान २ अखेर पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावताच साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिलेली भारताची महत्वकांक्षी योजना यशस्वी झाली अन सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रात  इस्रोच्या शास्त्रज्ञांनी जल्लोष करत चंद्रोत्सव साजरा केला. येत्या १५ दिवस हे यान पृथ्वीभोवती फिरणार असून यानंतर ते चंद्राकडे वाटचाल करणार आहे.     गेल्या सोमवारी चांद्रयान २ च्या प्रक्षेपणाच्या ५६ मिनिट २४ सेकंदा आधी प्रक्षेपकाच्या तिसऱ्या स्टेजमधील क्रायोजनीक इंजिनाच्या टाकीत गळती आढळल्यामुळे ऐनवेळी प्रक्षेपण स्थगित करावे लागले होते. यामुळे ही प्रक्षेपण कधी होणार याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र, इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आठवड्याभरात ही गळती दुर करून चांद्रयानाच्या पुर्नप्रक्षेपणाची तारीख जाहीर केली. त्यानुसार सोमवारी दुपारी २ वाजुन ४३ मिनिटांनी यानाच्या प्रक्षेपणाची तयारी पूर्ण करण्यात आली होती. यावेळी प्रक्षेपणात कुठलेही अडथळे येऊ नये यासाठी शास्त्रज्ञांनी काळजी घेतली होती.   सकाळपासूनच सतीश धवन अंतळार केंद्रातील नियंत्रण कक्षात जीएसएव्ही मार्क ३ प्रक्षेपकाच्या प्रत्येक बाबींवर शास्त्रज्ञ लक्ष ठेऊन होते. इंधनाच्या टाकीतील दोष दुर करण्यात आल्यामुळे सकाळी प्रक्षेपकाचे काउंटडाऊन सुरू करण्यात आले होते. जशी जशी प्रक्षेपणाची वेळ जवळ येत होती तशी प्रत्येकाची उत्कंठा शिगेला पोहचली होती. हा सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी आजुबाजुच्या गावातील नागरिकही यानाच्या प्रक्षेपणाकडे डोळे ठेवून होते.      प्रक्षेपणात मोहिमेत ढगाळ वातावणाचा धोका होता. मात्र, चंद्राच्या दिशेने भारताचे झेपावणाऱ्या दुसऱ्या पावलात ना ढग आडवे आले ना पाऊस मध्ये आला. प्रक्षेपकाच्या उड्डाणापुर्वी सतीश धवन अंतराळ केंद्रातील वातावरण तंग झाले होते.  मीडिया सेंटरच्या इमारतीवरून भारतातीलच संपूर्ण जगभरातून माध्यमांचे प्रतिनिधी या सोहळ्याचे वार्तांकन करण्यासाठी आले होते. अखेर अखेर उलटी गणती शेवटच्या क्षणात आली. मोहीम प्रमुखांनी शेवटच्या १० मिनिटांच्या उलट गणातील सुरुवात केली. जशी जशी प्रक्षेपणाची वेळ जवळ आली तशी सेकण्ड लाँच पॅड च्या दिशेने कॅमेरे आणि मोबाईल सरसावले. [प्रक्षेपणासाठी केवळ १० सेकेंड असताना मोहीम प्रमुखांनी उलट गणती सुरु केली. पाच, चार, तीन, दोन, एक, शून्य होताच लाँच पॅड च्या दिशेतून मोठा आवाज झाला. काही  क्षणात जीएसएलव्ही प्रक्षेपक चांद्रयान २ ला घेऊन अवकाशात झेपावले अन उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवत भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक  करत भारत माता की जय चा जयघोष करत चंद्रोत्सव केला.      सतीश धवन अंतराळ केंद्रातील मुख्य नियंत्रण केंद्रातून सर्व शास्त्रज्ञ प्रकेशेपकाच्या वेगावर लक्ष ठेऊन होते. पहिल्या काही मिनिटात प्रक्षेपकाचे दोन बूस्टर वेगळे झाले. प्रक्षेपक वर जाता शास्त्रज्ञांचा चेहऱ्यावरचा आत्मविश्वास झळकत होता. काही मिनिटांच्या अवधीतच यानाचा पृथ्वीच्या कक्षेत जाण्याचा दुसरा टप्पा सुरु झाला. काही वेळात दुस-या टप्यातील इंजन यानापासून वेगळे होऊन क्रायोजनिक इंजिन सुरु झाले अन चंद्रयान पृथ्वीच्या कक्षेत स्तिरावले. यान पृथिवीच्या कक्षेत स्तिरावताच चांद्रयायानावरील केमे-यातून थेट प्रकेशपण दाखवण्यात आले. प्रक्षेपकापासून चांद्रयान २ दूर झाले आणि सर्वांनी जल्लोष केला.  नियंत्रण कक्षात शास्त्रज्ञांनी जल्लोष करत एकमेकांना मोहीम यशस्वी झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. 

--------------------- देशाभिमानाने उपस्थितांचे ऊर आले भरून सतीश धवन अंतराळ केंद्रातील मीडिया सेंटरमध्ये माध्यमी प्रतिनिधीची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी काही स्थानिक नागरिकही या ठिकाणी आले होते. जीएसएलव्ही प्रक्षेपक आकाशात झेपावताच त्यांनी जल्लोष केला. भारतीय शास्त्रज्ञाचे अभिनंदन करणारे फ्लेक्स हाती घेऊन त्यांनी अभिनंदन केले. हा क्षण भारतीय म्हणून अभिमान निर्माण करणारा आहे. शास्त्रज्ञांनी दिवस रात्र एक करून मोहीम यशस्वी केली. या दिव्य यशामुळे  भारतीय असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या 

..............  चंद्रावर जीवसृष्टी तसेच पाण्याचा अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान २ मोहीम आखली आहे. या मोहिमेंतर्गत चंद्रावर यान सोडण्यात येणार आहे. हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. यासाठी तीन टप्पे आखण्यात आले आहे. ऑब्रिटर, विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रवाच्या अलगत  उतरविण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी यानाच्या सर्व तपासण्या इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केल्या. यानात गेल्या वेळ सारख्या त्रुटी राहू नयेत यासाठी विषेश काळजी घेण्यात आली होती. यानात इंधन भरण्यास सकाळी सुरुवात करण्यात आली होती. यानंतर  उड्डाणाची उलटी गणती सुरु करण्यात आली. अतिशय महत्वाकांशी असणा-या या मोहिमेकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. प्रक्षेपणासाठी इस्रो तर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली होती.  

......................भारतीय शास्त्रज्ञांनी रचला इतिहास चांद्रयान १ या मोहिमेच्या यशानंतर चांद्रयान २ मोहीमेसाठी २००८ पासून इस्रोचे शास्त्रज्ञ तयारी करत आहे. आज त्याची प्रतीक्षा संपली असून पुन्हा चंद्र एकदा भारतीय शास्त्रज्ञांच्या कवेत येणार आहे. पृथ्वीच्या कक्षेत यान स्थिरावल्यानंतर १६ दिवस पृथ्वी भोवती हे यान प्रदक्षिणा घालणार आहे. यानंतर हे यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या जोरावर चंद्राच्या कक्षेत जाणार आहे.  

टॅग्स :PuneपुणेChandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रो