चंद्रप्रभा अनाथालय अनधिकृत

By Admin | Updated: May 31, 2014 05:33 IST2014-05-31T05:33:33+5:302014-05-31T05:33:33+5:30

टाकवे या दुर्गम व डोंगराळ भागात असलेल्या अनाथाश्रमात बालकांकरिता आवश्यक कोणत्याही सुविधा नाहीत़ हे अनाथालय पूर्णपणे शासनाच्या कोणत्याही विभागाची परवानगी न घेता अनधिकृतपणे चालविण्यात येत होते

Chandraprabhas Orphanage Unauthorized | चंद्रप्रभा अनाथालय अनधिकृत

चंद्रप्रभा अनाथालय अनधिकृत

अलिबाग : टाकवे या दुर्गम व डोंगराळ भागात असलेल्या अनाथाश्रमात बालकांकरिता आवश्यक कोणत्याही सुविधा नाहीत़ हे अनाथालय पूर्णपणे शासनाच्या कोणत्याही विभागाची परवानगी न घेता अनधिकृतपणे चालविण्यात येत होते, असे रायगड जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी. जी. भवाने यांनी शासनाला दिलेल्या अहवालात नमूद केल्याने आरोपी अजित दाभोळकर अजून अडचणीत सापडला आहे. चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चालविण्यात येणारे हे वसतिगृह वा आश्रमशाळा आहे, हे बालगृह वा अनाथालय नाही, असा जबाब चंद्रभागा चॅरिटेबल ट्रस्टचा विश्वस्त आणि बेकायदा अनाथाश्रमाचा संचालक अजित दाभोळकर याने भवाने यांना दिला आहे. सर्वशिक्षा अभियानाचेही दुर्लक्ष २००३ पासून चालविण्यात येणार्‍या अनाथालयातील मुला-मुलींना पूर्वी रायगड जिल्हा परिषदेच्या कशेळे-कवडेवाडी येथील शाळÞेत शिकण्याकरिता पाठविण्यात येत असे. परंतु तीन-चार वर्षांपासून मुलांना शाळेत पाठविणे बंद करण्यात आले आहे. इ. १ ली ते ८ वीचा अभ्यासक्रम अनाथालयातच तीन शिक्षक ठेवून शिकविण्यात येत होता. केवळ परीक्षेकरिता जि.प.च्या कशेळे-कवडेवाडी शाळेतून बसविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे परिविक्षा अधिकारी कुवळेकर यांनी दिली. मुलांना शाळेत न पाठवता थेट परीक्षेला बसविण्याकरिता शासकीय परवानगी जि.प.च्या शिक्षण अधिकार्‍यांनी दिली होती का, एकही बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याकरिता डांगोरा पिटणार्‍या सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत या अनाथालयातील २८ बालकांची नोंद का घेण्यात आली नाही, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, कर्जत पोलीस ठाण्याकडील तपास आता रायगड जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग केल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी दिली.

Web Title: Chandraprabhas Orphanage Unauthorized