शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटलांचे विधान शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळणारं, शेतक-यांची माफी मागावी: महाराष्ट्र राज्य किसान सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 16:44 IST

बोगस अर्ज भरणा-यांनाच केवळ अर्ज भरण्यात अडचण येत आहे असं विधान राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात केलं होतं.

ठळक मुद्दे पाटलांचे विधान शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळणारं असून त्यांनी शेतक-यांची माफी मागावी शेतक-यांचा अधिक अंत न पाहता केलेल्या विधानाबद्दल चंद्रकांत पाटलांनी शेतक-यांची माफी मागावी व उर्वरित सर्व शेतक-यांचे अर्ज ऑफ लाईन पद्धतीने स्वीकारून आधार कार्ड व इतर पुर्ततेसाठी मुदत वाढवून द्यावी

अकोले, दि. 12 - राज्यात आजपर्यंत 71 लाख 40 हजार शेतक-यांनी कर्जमाफीचे अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांमध्ये दहा लाख अर्ज बोगस आहेत. बोगस अर्ज भरणा-यांनाच केवळ अर्ज भरण्यात अडचण येत आहे असं विधान राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा राज्य किसान सभेने कठोर शब्दात निषेध व्यक्त केला आहे. तसेच पाटलांचे विधान शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळणारं असून त्यांनी शेतक-यांची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे. ''कर्जमाफीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सरकारने ऑन लाईन स्वरुपाची केली आहे. अर्ज भरताना शेतक-यांचा सात बारा, आधार कार्ड, हाताच्या अंगठ्याचे ठसे  व पिक कर्जाची माहिती अपलोड केल्या शिवाय ऑन लाईन यंत्रणा अर्जच स्वीकारत नाही. अशा प्रक्रियेमुळे शेतकरी नसलेली कोणतीही ‘बोगस’ व्यक्ती अर्जच भरू शकत नाही अशी वस्तुस्थिती आहे. असे असताना दहा लाख लोकांनी असे ‘बोगस’ अर्ज भरले आहेत असे बेजबाबदार विधान चंद्रकांत पाटलांनी केले आहे. शेतक-यांमध्ये त्यांच्या या विधानाचे अत्यंत संतापजनक पडसाद उमटत आहेत. सरकारने कर्जमाफीसाठी अनेक जाचक अटी शर्थी लागू केल्या आहेत. सरकारच्या या अटी शर्तीमध्ये न बसल्याने लाखो शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरणार हे उघड आहे. अर्ज भरलेल्या शेतक-यांपैकी अटी शर्ती मध्ये न बसणा-या शेतक-यांना कर्जमाफीसाठी ‘अपात्र’ असल्याचे म्हणणे समजू शकते. मात्र अशा शेतक-यांना ‘बोगस’ म्हणून चंद्रकांत पाटलांनी त्यांच्या मनात शेतक-यां विषयी कशा प्रकारे तिरस्कार आहे हेच दाखऊन दिले आहे'' अशा शब्दात  राज्य किसान सभेने निषेध व्यक्त केला. ''अर्ज भरण्याच्या जटीलतेमुळे अनेक शेतक-यांना अद्यापही अर्ज दाखल करता आलेले नाहीत. अर्ज भरण्यासाठी आता केवळ चारच दिवसांची मुदत शिल्लक आहे. अनेक शेतक-यांचे आधार कार्ड रिजेक्ट झालेले आहेत. अनेकांकडे आधार कार्ड नाहीत. परराज्यातील आधार कार्ड मधील नंबर अर्ज भरताना नमूद होत नाहीत. अनेक शेतक-यांच्या बोटाचे ठसे उमटत नाहीत. आधार कार्ड मधील चुका दुरुस्त होण्यास वेळ लागत असल्याने मुदतीत अर्ज भरण्याच्या शक्यता मावळू लागल्या आहेत. सर्व्हर डाऊन असल्यानेही अर्ज भरताना अडचणी येत आहेत. अशा अनेक अडचणी असताना केवळ बोगस अर्ज भरणा-यांना अडचणी येत आहेत असे म्हणून या अडचणी असलेले सर्वच शेतक-यांना चंद्रकांत पाटीलांनी बोगस ठरवून टाकले आहे. त्यांचे हे विधान या सर्व शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळणारे आहे. अशा परिस्थितीत शेतक-यांचा अधिक अंत न पाहता केलेल्या विधानाबद्दल चंद्रकांत पाटलांनी शेतक-यांची माफी मागावी व उर्वरित सर्व शेतक-यांचे अर्ज ऑफ लाईन पद्धतीने स्वीकारून आधार कार्ड व इतर पुर्ततेसाठी मुदत वाढवून द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभा करत आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी