शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

ठरलं! चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरूडमधून लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 12:54 IST

केंद्रीय नेतृत्वानं मी विधानसभा लढवावी, असा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर- जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. जनतेतून निवडून येण्याचे आव्हान करणाऱ्या विरोधी पक्षांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आता कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, केंद्रीय नेतृत्वानं मी विधानसभा लढवावी, असा निर्णय घेतला आहे.कोल्हापुरात दोन्ही आमदारांना बाजूला व्हा मी लढतो, असं सांगता येत नाही. काही भविष्यातील गणितंही केंद्रीय नेतृत्वाच्या मनात असतील. तुला पुण्यातून कोथरूड लढवायची आहे, असं केंद्रीय नेतृत्वानं सांगितलं आहे. कोथरूड हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. लोकसभेला तिथून भाजपाला एक लाख 50 हजारांचं मताधिक्क्य मिळालं होतं. पुणेकर मला बाहेरचा म्हणणार नाहीत. कोथरूड माझ्याइतकं कोणालाच माहीत नाही. गेल्या 13 वर्षांपासून मी कोथरूडमध्ये येतोय. 12 वर्षं पुणे पदवीधरचा मी आमदार राहिलेलो आहे. मंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्री म्हणून मी पुण्यात वारंवार जात असतो. पुण्यातील गल्ल्यागल्ल्यात माझी ओळख असल्यानं पुणेकर मला परका मानणार नाहीत, असंही ते म्हणाले आहेत.  

सध्या कोथरुड मतदारसंघामध्ये भाजपाच्या मेधा कुलकर्णी या आमदार आहेत. कोथरुड मतदारसंघामधून पाटील यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता निर्माण होताच आता अखिल भारतील ब्राह्मण महासंघाकडून त्यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला आहे. प्रसंगी ब्राह्मण महासंघाने स्वतः चा उमेदवार उभा करण्याची तयारी देखील दर्शवली आहे. युतीत शिवसेनेकडे असणारा कोथरुड मतदारसंघ 2014ला भाजपा आणि शिवसेना स्वतंत्र लढल्याने भाजपाकडे गेला. सध्या भाजपाच्या मेधा कुलकर्णी या कोथरुडच्या आमदार आहेत. भाजपा अनेक विद्यमान आमदारांची तिकीट कापण्याची शक्यता आहे. त्यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे यंदा विधानसभेची निवडणूक कोथरूड मतदारसंघातून लढवणार आहेत. कोथरुड मतदारसंघामध्ये ब्राह्मण समाजाची मते जास्त आहेत. त्यामुळे आता अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून त्यांना विरोध केला जात आहे. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kothrud-acकोथरुड