शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

Chandrakant Patil Exclusive : नितीन गडकरींमुळे मला आमदारकी मिळाली, सरकार असताना जे मिळालं ते अमित शाह यांच्यामुळे : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 11:26 IST

Chandrakant Patil Exclusive : चंद्रकांत पाटील यांनी उलगडला स्वत:च्या आयुष्याचा पट.

राजकीय जीवनात आमदारकी मिळाली ती नितीन गडकरी यांच्यामुळे मिळाली असल्याचं वक्तव्य माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील केलं. "जावडेकर यांची पश्चिम महाराष्ट्रातील परंपरागत जागा गेली ती तुमच्या जनसंपर्कामुळे खेचून आणू शकता असं म्हणत त्यांनी थेट घोड्यावरच बसवलं. त्यावेळी निवडणूक हा विषयदेखील कळत नव्हता," असा किस्सा पाटील यांनी सांगितला ‘लोकमत’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी ‘फेस टू फेस’ या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी आजवरच्या प्रवासातील टप्पे आणि किस्से पाटील मनमोकळेपणानं बोलले. 

चर्चेदरमयान त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचादेखील आपल्या राजकीय जीवनात मोलाचा वाटा असल्याचं पाटील यांनी सांगितलं. "कर्तृत्व हा भाग बाजूला केला तर सरकार असताना मला जे काही मिळालं ते अमित शाह यांच्यामुळेच मिळालं आहे. याबाबत आपल्या मनात तिळमात्र शंकाही नाही," असं ते म्हणाले. विधान परिषदेचा नेता कोण व्हावा याबाबत अमित शाह यांच्या मनात कोणताही संदेह नव्हता. वरच्या सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटीलच बनतील असं अमित शाह यांनी सहजरित्या देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांनाही त्यात काही समस्या नव्हतीच. २०१४ ते २०१९ या कालावधीत मला जे काही मिळालं त्यासाठी जी एक साथ आवश्यक होती ती देखील अमित शाह यांनी दिल्याचे ते म्हणाले.तुम्ही मला रद्दी द्या..."आमदार झाल्यानंतर वाढदिवसाला अनेक लोक पुष्पगुच्छ, हार घेऊन भेटायला येणार याची कल्पना होती. त्यावेळी मी त्यांना यासाठी लागणारे पैसे वाया न घालवता रद्दी देण्याची विनंती केली. ती रद्दी विकून १ रूपया आला तर मी १ रुपया त्यात टाकणार असं ठरवलं. महिलांना प्रशिक्षण देणारी देशातील सर्वात मोठी एक संस्था आहे त्यांनी आमच्याकडे एक प्रोजेक्टर मागितला होता. त्याची किंमतही ३४ हजार होती आणि तेही आमच्याकडे नव्हते. रद्दीच्या पैशातून आपण त्यांना प्रोजेक्टर देऊ असं सांगितलं. परंतु त्यावेळी ती रद्दी इतकी जमली की प्रोजेक्टरचे पैसे देऊनही ८ हजार रूपये उरले," असं पाटील यावेळी म्हणाले. कोल्हापूरात बुडालेल्या प्रेतांचा शोध घेणारा दिनकर नावाचा एक मुलगा आहे. तो अतिशय गरीब आहे. त्या उरलेल्या ८ रूपयांमधून आम्ही त्या २ लाखांचा विमाही काढला, असंही त्यांनी नमूद केलं. 

रुग्णांच्या सेवेची 'सावली'"सावली नावाच्या एका संस्थेचं मोठं काम करण्याचं भाग्य मला लाभलं. बेडवर असलेल्या रुग्णांची सेवा करण्याचं काम या संस्थेद्वारे करण्यात येतं. त्यावेळी एका भाड्याच्या बंगल्यामध्ये ९० जणांची व्यवस्था करत होते. त्यावेळी मी त्यांना इमारत बांधण्याचा सल्ला दिला. परंतु इमारत कशी बांधायची हा प्रश्न होता. नंतर आम्ही घरोघरी डबे दिले आणि त्यात रद्दी विकून पैसे टाकण्याचं आवाहन केलं. जेव्हा डबा उघडला जाईल तेव्हा त्यात जितके पैसे असतील तितके आपण टाकू आणि संस्थेला एक इमारत बाधून देऊ असं ठरवलं. परंतु त्यानंतर आमचं सरकारही आलं. आता ६ मजल्यांची त्या ठिकाणी १६० रूग्णांची सेवा करणारी सावली उभी झाली," असं पाटील यांनी सांगितलं.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीchandrakant patilचंद्रकांत पाटीलAmit Shahअमित शाह