भुजबळांच्या बाजूला दोन-तीन कोठड्या रिकाम्या आहेत, चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 12:48 PM2018-04-06T12:48:51+5:302018-04-06T12:53:02+5:30

वांद्रे-कुर्ला संकुलातल्या महामेळाव्याच्या निमित्तानं भाजपानं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. या महामेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश मेहतांसह दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली आहे.

Chandrakant Patil criticized on Ajit Pawar in bjp rally | भुजबळांच्या बाजूला दोन-तीन कोठड्या रिकाम्या आहेत, चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा

भुजबळांच्या बाजूला दोन-तीन कोठड्या रिकाम्या आहेत, चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा

Next

मुंबई: भाजपाच्या 38 व्या स्थापना दिनानिमित्त वांद्रे-कुर्ला संकुलातल्या महामेळाव्यात भाजपानं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. या महामेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश मेहतांसह दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली आहे. या महामेळाव्यात भाजपा नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटलांनी राष्ट्रवादीच्या अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

विशेष म्हणजे कधी नव्हे ते चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेची बाजू घेत अजितदादांना खडे बोल सुनावले आहेत. शिवसेनेला गांडूळ म्हणणारेच राज्याला लागलेली वाळवी आहे. हल्लोबोल करणा-यांनी आधी स्वतःचा गल्ला भरलाय. भुजबळांच्या बाजूला दोन-तीन कोठड्या रिकाम्या असल्याचं म्हणत चंद्रकांत पाटलांनी अजितदादांना टोला लगावला आहे. चंद्रकांतदादा पाटलांनी अनपेक्षितपणे शिवसेनेची बाजू घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

Web Title: Chandrakant Patil criticized on Ajit Pawar in bjp rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.