शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 20:54 IST

Chandrahar Patil news: लोकसभेला काँग्रेसमधून बंडखोरी करून विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटलांना धुळ चारली होती. ठाकरेंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

यंदाची सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक भलतीच गाजली होती. महाविकास आघाडीत सांगलीवर काँग्रेस दावा सांगत होती, तर उद्धव ठाकरेंचीशिवसेना तुम्हाला कोल्हापूर सोडली असे सांगत सांगली मागत होती. अशातच उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची नाराजी ओढवून घेत परस्पर आपला उमेदवार जाहीर करून टाकला होता. ज्या उमेदवारासाठी ठाकरे सेनेने एवढा आडमुठेपणा केलेला तोच उमेदवार आता ठाकरे शिवसेना सोडून शिंदे शिवसेनेत चालला आहे. पैलवान चंद्रहार पाटलांनी आज याची घोषणा केली आहे.

लोकसभेला काँग्रेसमधून बंडखोरी करून विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटलांना धुळ चारली होती. ठाकरेंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. परंतू, संपूर्ण काँग्रेस विशाल पाटलांच्या बाजुने गेली आणि चंद्रहार पाटलांच्या पराभवाचा निकाल लागला होता. तेव्हापासून चंद्रहार पाटील राजकारणापासून बाजुलाच होते. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोकण दौऱ्यावेळी चंद्रहार पाटील यांची शिंदेसेनेतील नेत्यांसह उपस्थिती दिसली होती. यावरून चंद्रहार पाटील आता शिवसेना शिंदे गटात जाणार असे दावे राजकीय वर्तुळात होऊ लागले होते, ते आता खरे ठरले आहेत.  

२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला प्रचंड मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले. यानंतर ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसले. संपूर्ण राज्यातून नेते, पदाधिकारी, हजारो कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करून शिवसेना शिंदे गटात गेले. ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात जाण्याचा सिलसिला अद्यापही सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. 

राज्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत असताना, बऱ्याच त्रुटी, अडचणी, गैरप्रकार मी अनुभवलेले आहेत. अशा बाबींविरुद्ध मी वेळोवेळी आवाज देखील उठवला आहे. परंतु प्रत्यक्ष शासन सहभागाशिवाय असे प्रश्न मार्गी लागणे कठीण आहे. म्हणून क्रीडा क्षेत्रामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी, मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सरकार सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे आज चंद्रहार पाटलांनी जाहीर केले आहे. सोशल मीडियावर त्यांनी ही पोस्ट केली आहे.

टॅग्स :chandrahar patilचंद्रहार पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे