‘चांदणी’ला विक्रमी १५ लाखांची बोली !
By Admin | Updated: December 8, 2014 02:31 IST2014-12-08T02:31:38+5:302014-12-08T02:31:38+5:30
येथील ३५५ वर्षांच्या ऐतिहासिक घोडेबाजारात चांदणी या घोडीला विक्रमी १५ लाख रुपयांची बोली लागली. कुस्तीपटू व महाराष्ट्र केसरी राहुल रामचंद्र यांनी ‘चांदणी’ला विकत घेतले.

‘चांदणी’ला विक्रमी १५ लाखांची बोली !
सारंगखेडा (नंदुरबार) : येथील ३५५ वर्षांच्या ऐतिहासिक घोडेबाजारात चांदणी या घोडीला विक्रमी १५ लाख रुपयांची बोली लागली. कुस्तीपटू व महाराष्ट्र केसरी राहुल रामचंद्र यांनी ‘चांदणी’ला विकत घेतले.
दत्तजयंतीपासून सुरू झालेल्या येथील यात्रेत रविवारी उत्तर प्रदेशातील धौरातोंडा येथील विक्रेते खालीद अब्दुल करीम यांनी चांदणी या घोडीला विक्रीसाठी आणले होते. यात्रेच्या इतिहासात यापूर्वी २००७ मध्ये सात लाख, तर गेल्या वर्षी सर्वाधिक ११ लाख रुपयांना घोड्याची विक्री झाली होती.
यंदा पुणे जिल्ह्यतील लोणी काळभोर (ता. हवेली) येथील कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी राहुल रामचंद्र यांनी सर्वाधिक १५ लाख रुपयांची विक्रमी बोली लावत गेल्या वर्षीचा विक्रम मोडला. चांदणी या घोडीची उंची सुमारे ६५ इंच आहे. (प्रतिनिधी)