चंदगडचे माजी आमदार नरसिंगराव पाटील यांचं निधन
By Admin | Updated: August 9, 2016 17:34 IST2016-08-09T17:34:40+5:302016-08-09T17:34:40+5:30
चंदगड तालुक्याचे माजी आमदार नरसिंगराव गुरुनाथ पाटील यांचे मंगळवारी ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते.

चंदगडचे माजी आमदार नरसिंगराव पाटील यांचं निधन
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 09 - चंदगड तालुक्याचे माजी आमदार नरसिंगराव गुरुनाथ पाटील यांचे मंगळवारी ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते.
नरसिंगराव पाटील हे दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना विक्री विरोधात याचिका दाखल करण्यासाठी मुंबईला गेले असता काळाने त्यांच्यावर झडप घातली. चंदगड तालुक्याचे आमदार म्हणून त्यांनी बराच काळ राजकारणावर ठसा उमटवला होता.
चंदगड तालुक्यातील म्हाळेवाडी हे नरसिंगराव पाटील यांचे मुळ गाव असून त्यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या गावासह संपूर्ण तालुक्यात बहुतांश व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. उद्या सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.