पंकज भुजबळ, सावकारे यांच्यापुढे पक्षांतर्गत आव्हान
By Admin | Updated: August 28, 2014 03:08 IST2014-08-28T03:08:24+5:302014-08-28T03:08:24+5:30
राज्यमंत्री संजय सावकारे, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळांचे पुत्र व नांदगावचे विद्यमान आ. पंकज भुजबळ आदी नेत्यांना पक्षांतर्गत आव्हानांचा सामना करावा लागणार

पंकज भुजबळ, सावकारे यांच्यापुढे पक्षांतर्गत आव्हान
मुंबई : राज्यमंत्री संजय सावकारे, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळांचे पुत्र व नांदगावचे विद्यमान आ. पंकज भुजबळ आदी नेत्यांना पक्षांतर्गत आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. या दोन्ही नेत्यांच्या मतदारसंघातून उमेदवारीसाठी राष्ट्रवादीतील अन्य इच्छुकांनीही अर्ज केले आहेत.
संजय सावकारे भुसावळ मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघातून सावकारेंसह तब्बल सहाजणांनी पक्षाकडे तिकिटाची मागणी केली आहे. तर, पंकज भुजबळांच्या नांदगाव मतदारसंघातही अन्य तिघांनी उमेदवारी मागितली आहे. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थित पक्षाच्या संसदीय मंडळाने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतींच्या बुधवारी शेवटच्या दिवशी विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील इच्छुकांनी गर्दी केली होती. येवला मतदारसंघात मात्र छगन भुजबळांशिवाय अन्य कोणीही अर्ज दाखल केला नाही. तसेच, जळगाव येथील चाळीसगाव मतदारसंघातून केवळ राजीव देशमुखांचा अर्ज आला. राजीव हे अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री अनिल देशमुखांचे चिरंजीव आहेत. तर, अकोल्यातूनही मधुकर पिचडांचे चिरंजीव वैभव पिचडांचा अर्ज आहे. वैभव हे आदिवासी विकास मंत्री आहेत. नवापूर मतदारसंघातून केवळ शरद गावितांचा अर्ज प्राप्त झाला आहे.