शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात भाजपला सुरुंग लावण्याचे काँग्रेसपुढे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 17:12 IST

भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मलकापूरचे विद्यामान आमदार चैनसुख संचेती यांनी आपल्या मतदारसंघात भाजपचा विजयाचा झेंडा अबाधित ठेवला आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीला अवघ्या तीन महिन्यांचा काळ शिल्लक राहिला आहे. त्यामुळे सगळ्याच मतदारसंघात राजकीय वातावरण तापत आहे. तर विद्यामान आमदारांना रोखण्यासाठी विरोधकांनी मतदारसंघ पिंजून काढणे सुरु केले आहे. मलकापूर मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून येणारे व विद्यामान आमदार चैनसुख संचेती यांचा विजयाचा रथ रोखणे काँग्रेस समोर मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे आमदार संचेती सहाव्यांदा विजयाची मालिका कायम ठेवणार का ? अशी चर्चा मतदारसंघात पहायला मिळत आहे.

भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मलकापूरचे विद्यामान आमदार चैनसुख संचेती यांनी आपल्या मतदारसंघात भाजपचा विजयाचा झेंडा अबाधित ठेवला आहे. १९९५ पासून आजपर्यंत संचेती यांनी मतदारसंघाच नेतृत्व आपल्याकडे कायम ठेवले आहे. पहिल्यांदा अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवणाऱ्या संचेती यांनी नंतर भाजपच्या तिकीटावर कायम निवडणूक लढवत विजयाची मालिका कायम ठेवली. काँग्रेसने प्रत्येकवेळी नवीन चेहरा देऊन संचेती यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र  विरोधकांना आजपर्यंत  संचेती  यांच्या विरोधात ५० हजाराच्या मतांचा टप्पा सुद्धा पार करता आला नाही विशेष.

लोकसभा निवडणुकीत मलकापूर मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी ६० हजार ४९६ चे मताधिक्य मिळवले होते. त्यामुळे भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणे काँग्रेससमोर मोठे आव्हान असणार आहे. त्यातच, पक्षातून उमेदवारीसाठी  डझनभर इच्छुकांचे अर्ज आले आहेत. इच्छुकांची यादी लक्षात घेत सक्षम उमेदवार निवडणे काँग्रेसाठी अडचणीचे ठरत आहे. 

भाजपकडून संचेती यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. तर, काँग्रेसकडून नगराध्यक्ष हरीश रावळ, राजेश इकडे, अरविंद कोलते यांच्या नावांची चर्चा आहे. जर आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला तर संतोष रायपुरे तर जळगाव जामोद मतदार संघातून संगीतराव भोंगळ उमेदवारीसाठी इच्छूक असल्याची चर्चा आहे. मात्र असे असली तरीही, संचेती यांचा मतदारसंघात असलेली लोकप्रियता पाहता, त्यांच्या विजयाचा रथ रोखणे विरोधकांसमोर आव्हान ठरणार आहे.