शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

Exclusive: तीन-चार मंत्र्यांना देणार डच्चू?; भाजपाकडून नव्या दमाच्या 'टीम देवेंद्र'ची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 13:29 IST

यादी तयार करण्याचे काम सुरू

यदु जोशी मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी बनविण्याचे काम सुरू झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी या बाबत गुरुवारी चर्चा केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. जातीय, प्रादेशिक संतुलन साधण्याबरोबरच नव्या-जुन्या चेहऱ्यांचा मेळ साधण्याचे आव्हान पक्षनेतृत्वासमोर आहे.

पंकजा मुंडे, राम शिंदे, डॉ.अनिल बोंडे हे तीन कॅबिनेट मंत्री पराभूत झाले आणि विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारीच मिळाली नाही. त्यामुळे भाजपच्या कोट्यातील ग्रामविकास, महिला व बालकल्याण, कृषी, जलसंधारण, ऊर्जा व उत्पादन शुल्क अशी महत्त्वाची खाती अन्य मंत्र्यांना दिली जाऊ शकतात. विद्यमान मंत्र्यांपैकी तीन ते चार जणांना डच्चू दिला जाऊ शकतो. त्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी देण्यास भाजपमध्ये मोठा वाव असेल.

गेल्या मंत्रिमंडळात विदर्भातून मुख्यमंत्र्यांसह भाजपचे सहा कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री होते. २०१४ च्या निवडणुकीत विदर्भातून भाजपचे ४४ आमदार निवडून आले होते. यावेळी ही संख्या २९ वर घसरली. त्यामुळे मंत्रिमंडळात पूर्वीइतका विदर्भाचा बोलबाला नसेल, असे म्हटले जाते. त्या उलट मुंबईसह कोकणातील भाजपचे संख्याबळ २६ वरून २७ गेले. त्यामुळे या भागाला वाढीव प्रतिनिधीत्व मिळू शकते. कोल्हापूर, पालघर आदी जिल्हे भाजपमुक्त झाल्याने तेथे कोणाला संधी मिळण्याची शक्यता नाही. अमरावती, चंद्रपूर, पुणे, अहमदनगर जिल्ह्यात भाजपची वाताहत झाली. ‘संकटमोचक’ गिरीश महाजन यांच्या जळगाव व उत्तर महाराष्ट्रात २०१४ च्या यशाची पुनरावृत्ती झाली नाही. संख्याबळ सहावरुन चारवर आले. धुळे, नंदुरबार, बुलडाण्याला स्कोअर सुधारता आला नाही. तेथील जयपराजयाचे विश्लेषण करण्यात आले असून त्यानुसार तेथील मंत्रिपदांबाबत निर्णय होणार असल्याची माहिती आहे.

तथापि, चांगले यश देणाºया जिल्ह्यांना चांगली मंत्रिपदे मिळू शकतात. त्यात मुंबई, ठाणे, अकोला, यवतमाळ, वर्धा, औरंगाबाद, जालना, नाशिक शहर, सातारा, सोलापूर जिल्हा आदींचा समावेश आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष पाटील पक्षातील काही नेत्यांशी सल्लामसलत करून एक यादी तयार करतील आणि पक्षश्रेष्ठींची मंजुरी घेतील, असे सूत्रांनी सांगितले.यावेळी मंत्रिमंडळात चांगली टीम देण्याचा प्रयत्न‘लॅक ऑफ टॅलेंट’चा आक्षेप फडणवीस यांच्या पहिल्या मंत्रिमंडळाबाबत सातत्याने घेतला गेला. दोनचार मंत्री सोडले तर मंत्रिपदाचा आवाका असलेले लोकच नाहीत असे म्हटले गेले. यावेळी हा आक्षेप दूर करुन चांगली टीम देण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न असेल.आवाका नसला तरी काही चेहºयांना जातीपातींचा विचार करुन घेतले जाते. यावेळीही तसा विचार झाला तर योग्यतेचा निकष काहींबाबत बाजूला ठेवला जावू शकेल.पहिल्या मंत्रिमंडळाचा चेहरा ‘ टीम देवेंद्र’ असा नव्हता. वेगवेगळ्या समीकरणांतून मंत्रिपदे दिली गेली. यावेळी ‘टीम देवेंद्र’चे सदस्य म्हणून ओळखले जाणारे काही चेहरे निश्चितच असतील, असे मानले जाते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा