पसार झालेल्या नायजेरीयनला बेड्या
By Admin | Updated: January 7, 2017 06:16 IST2017-01-07T06:16:25+5:302017-01-07T06:16:25+5:30
नायजेरीयन जॉन केनेडी चुकोव्हा इमेका ओकोराला अखेर पोलिसांनी गुरुवारी रात्री बोरीवली येथून बेड्या ठोकल्या आहेत.

पसार झालेल्या नायजेरीयनला बेड्या
मुंबई : अंमली पदार्थांच्या तावडीतून पसार झालेल्या नायजेरीयन जॉन केनेडी चुकोव्हा इमेका ओकोराला अखेर पोलिसांनी गुरुवारी रात्री बोरीवली येथून बेड्या ठोकल्या आहेत. शुक्रवारी न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
वाशी, कोपरखैराने येथे राहणाऱ्या जॉनविरुद्ध अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या आझाद मैदान युनिटने त्याला अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी अटक केली. (प्रतिनिधी)