अत्याचारापूर्वी आरोपींनी काढली होती छेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2017 00:58 IST2017-01-04T00:58:53+5:302017-01-04T00:58:53+5:30

कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून होण्याच्या दोन दिवस आधी मुख्य आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू शिंदे याच्यासह संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांनी तिची छेड काढली

Chad had been removed by the accused before torture | अत्याचारापूर्वी आरोपींनी काढली होती छेड

अत्याचारापूर्वी आरोपींनी काढली होती छेड

अहमदनगर : कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून होण्याच्या दोन दिवस आधी मुख्य आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू शिंदे याच्यासह संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांनी तिची छेड काढली होती,अशी साक्ष मंगळवारी मुलीच्या मैत्रिणीने न्यायालयासमोर दिली़ न्यायालयात हेच ते आरोपी असल्याचे सांगत तिने त्यांना ओळखले़
कोपर्डी खटल्याची जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू असून, मंगळवारी सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड़ उज्ज्वल निकम यांनी पीडित मुलीच्या वर्गमैत्रिणीची साक्ष घेतली़ कोपर्डी येथे १३ जुलैला अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून होण्याच्या दोन दिवस आधी ११ जुलैला पीडित मुलगी व तिची मैत्रीण शाळेतून घरी येत असताना शिंदे याच्यासह भवाळ व भैलुमे यांनी त्यांना वाटेत अडवून तिची छेड काढली तसेच तुला पाहून घेऊ, अशी धमकीही त्यांनी दिल्याचे साक्षीदार मुलीने न्यायालयासमोर सांगितले़ (प्रतिनिधी)

Web Title: Chad had been removed by the accused before torture