मेडिकल, अभियांत्रिकीसाठी ५ मे रोजी सीईटी

By Admin | Updated: January 5, 2016 03:14 IST2016-01-05T03:14:44+5:302016-01-05T03:14:44+5:30

राज्य शासनाचे प्रवेश नियामक प्राधिकरण आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील आरोग्य

CET for medical, engineering on May 5 | मेडिकल, अभियांत्रिकीसाठी ५ मे रोजी सीईटी

मेडिकल, अभियांत्रिकीसाठी ५ मे रोजी सीईटी

पुणे : राज्य शासनाचे प्रवेश नियामक प्राधिकरण आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी येत्या ५ मे रोजी ‘एमएचटी - सीईटी २०१६ ’ परीक्षा घेतली जाणार आहे.
शासनाने चालू शैक्षणिक वर्षात आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एकच सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाणार असल्याचे जाहीर केले होते. प्रवेशाच्या माहिती पुस्तिकेबाबत व अर्ज विक्री संदर्भातील सविस्तर माहिती देण्यात येईल, असे शासनातर्फे सांगण्यात आले आहे.
अभियांत्रिकीसाठी
अर्ज भरण्यास सुरुवात
आयआयटी आणि एनआयटीमधील प्रवेशासाठी सीबीएसईकडून घेतल्या जाणाऱ्या जेईई मेन्स परीक्षेचे प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांना येत्या १२ जानेवारीपर्यंत आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरता येईल. जेईई मेन्स परीक्षा येत्या ३ एप्रिल रोजी देशभरातील १२४ केंद्रांवर घेतली जाईल. राज्यातील विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई, अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे शहरांमधील केंद्रांवर परीक्षा देता येणार आहे. जेईई मेन्स परीक्षेतील पात्र दीड लाख विद्यार्थ्यांना जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा देता येईल.

Web Title: CET for medical, engineering on May 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.