विद्यार्थी मारहाणप्रकरणी ‘सीईओ’ला अटक

By Admin | Updated: July 12, 2014 01:11 IST2014-07-12T01:11:38+5:302014-07-12T01:11:38+5:30

मराठी बोलल्याच्या कारणावरून विद्याथ्र्याना मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र सिंग (वय 43, रा. वडगाव शेरी) याला शुक्रवारी सकाळी भोसरी पोलिसांनी घरातून अटक केली.

The CEO arrested for the student assault | विद्यार्थी मारहाणप्रकरणी ‘सीईओ’ला अटक

विद्यार्थी मारहाणप्रकरणी ‘सीईओ’ला अटक

पिंपरी : मराठी बोलल्याच्या कारणावरून विद्याथ्र्याना मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र सिंग (वय 43, रा. वडगाव शेरी) याला शुक्रवारी सकाळी भोसरी पोलिसांनी घरातून अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली. भोसरी-दिघी प्रियदर्शनी इंग्रजी माध्यम शाळेत बुधवारी संस्थेचा मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या सिंग याने मराठीत का बोलता, अशी विचारणा करीत विद्याथ्र्याना काठीने झोडले. 
याबाबत एका संस्थेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर सिंग याच्यावर लहान मुलांना मारहाण केल्याच्या कलमाखाली गुन्हा  दाखल केला. दरम्यान, शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास त्याला राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. दुपारी साडेतीनच्या सुमारास पिंपरी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. जामिनासाठी अर्ज केल्यानंतर त्याची मुक्तता करण्यात आली. (प्रतिनिधी)

 

Web Title: The CEO arrested for the student assault