केंद्रीय पथकाचा पळपुटेपणा !
By Admin | Updated: December 17, 2014 02:57 IST2014-12-17T02:57:25+5:302014-12-17T02:57:25+5:30
रेणापूर तालुक्यातील पळशी येथे नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून जाफर शेख पासुमीया (६५) या शेतकऱ्याने सोमवारी मध्यरात्री आत्महत्या केली.

केंद्रीय पथकाचा पळपुटेपणा !
लातूर : रेणापूर तालुक्यातील पळशी येथे नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून जाफर शेख पासुमीया (६५) या शेतकऱ्याने सोमवारी मध्यरात्री आत्महत्या केली. त्यामुळे दुष्काळ पाहणीसाठी जिल्हा दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय पथकाने ऐनवेळी पळशी जाणे टाळले. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हिरमोड झाला.
जाफर यांना चार एकर शेती होती़ ही जमीन फिरोज शेख याच्या नावावर आहे़ या शेतीवर आयसीआयसीआय बँकेचे पाच लाखांचे कर्ज आहे़ त्यातच नापिकी, बँकेचे काढलेले कर्ज, दुष्काळग्रस्त स्थिती अशा तिहेरी संकटात सापडल्याने यातून मार्ग काढावा कसा़. तसेच मुलीचे लग्न कसे करावे, अशी चिंता त्यांना सतत सतावत होती. त्यामुळे सोमवारी मध्यरात्री त्यांनी गळफास घेतला. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, पत्नी, तीन मुले, तीन मुली असा परिवार आहे़
केंद्रीय पथक दुष्काळी पाहणीसाठी सोमवारपासून जिल्हा दौऱ्यावर आहे. या पथकाकडून मंगळवारी सकाळी पळशी व बावची गावातील पीक पाहणी होणार होती़ मात्र पथकाने पळशी गावाला फाटा देत बावची शिवारातील पिकाची पाहणी केली़
या गावातही अवघे ७ मिनिटे पथकातील सदस्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला़ मात्र शेतकऱ्यांशी संवाद साधला नाही.