मध्य रेल्वेची सीएसटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

By Admin | Updated: January 5, 2017 08:06 IST2017-01-05T07:33:37+5:302017-01-05T08:06:07+5:30

विक्रोळीजवळ लोकल बंद पडली असल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे

Central Railway traffic disrupted by CST | मध्य रेल्वेची सीएसटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची सीएसटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. विक्रोळीजवळ लोकल बंद पडली असल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. धीम्या मार्गावर लोकल बंद पडली असून सीएसटीकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे. लोकल सध्या हटवण्यात आली असून धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. सीएसटीकडे जाणा-या लोकल सध्या 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं असून मुंबईच्या दिशेने येण्यासाठी घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. लोकल उशिराने धावत असल्याने रेल्वे स्थानकांवरील गर्दी वाढू लागली आहे.

Web Title: Central Railway traffic disrupted by CST