मध्य रेल्वेसेवा विस्कळीत

By Admin | Updated: April 1, 2017 03:36 IST2017-04-01T03:36:43+5:302017-04-01T03:36:43+5:30

ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील फाटकामध्ये शुक्रवारी सकाळी वाहतूक कोंडी झाल्याने फाटक

Central Railway service disrupted | मध्य रेल्वेसेवा विस्कळीत

मध्य रेल्वेसेवा विस्कळीत

डोंबिवली : ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील फाटकामध्ये शुक्रवारी सकाळी वाहतूक कोंडी झाल्याने फाटक १५ मिनिटांहून अधिक काळ उघडे राहिले. परिणामी, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.
डोंबिवली रेल्वे स्थानक प्रबंधक ओमप्रकाश करोटिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकुर्ली स्थानकातील रेल्वे फाटक लोकल व लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकाचा अंदाज घेऊन काही ठरावीक वेळेनंतर वाहनांसाठी उघडले जाते. शुक्रवारी फाटक सकाळी ११.४० च्या सुमारास उघडले, पण ठाकुर्ली पूर्व-पश्चिमेला जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असल्याने कोंडी झाली. परिणामी, फाटक वेळेत बंद झाले नाही. त्यामुळे जलद आणि धिम्या मार्गावर लोकल खोळंबून राहिल्या. १५ मिनिटांनंतर वाहनांची संख्या कमी झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. (प्रतिनिधी)

Web Title: Central Railway service disrupted