मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक
By Admin | Updated: February 14, 2015 04:03 IST2015-02-14T04:03:33+5:302015-02-14T04:03:33+5:30
माटुंगा-मुलुंड जलद डाऊन मार्गासह हार्बरच्या कुर्ला-सीएसटी आणि वडाळा रोड-माहीम स्थानकांदरम्यान रविवारी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार

मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक
डोंबिवली : माटुंगा-मुलुंड जलद डाऊन मार्गासह हार्बरच्या कुर्ला-सीएसटी आणि वडाळा रोड-माहीम स्थानकांदरम्यान रविवारी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हे ब्लॉक अनुक्रमे सकाळी १०.४५ ते दुपारी ३.१५ आणि सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० या कालावधीत घेण्यात येणार आहेत.
या ब्लॉकमुळे माटुंगा-मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलदच्या गाड्या डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येणार असून या कालावधीतील वळविलेल्या लोकल सर्व स्थानकांमध्ये थांबविण्यात येणार असल्याचे ‘मरे’च्या जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले़ हार्बरच्या कुर्ला-सीएसटीसह वडाळा रोड-माहीम स्थानकांदरम्यान ब्लॉक असेल. या कालावधीत कुर्ला-भायखळादरम्यान हार्बरची वाहतूक जलदमार्गे वळवली जाणार असून भायखळ्यानंतर ती पुन्हा हार्बरमार्गे धावेल़ सीएसटी-अंधेरी/बांद्रा आणि तेथून सीएसटीमार्गे येणारी वाहतूक ब्लॉककालावधीत रद्द करण्यात येणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी ब्लॉकच्या कालावधीत पश्चिम रेल्वेमार्गावरून सकाळी १० ते संध्या. ६ या वेळेत प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.