कुर्ला-वाशी मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

By Admin | Updated: May 31, 2014 22:43 IST2014-05-31T19:12:39+5:302014-05-31T22:43:46+5:30

रविवारी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक आहे. हा ब्लॉक सकाळी ११. ३० ते दुपारी ४ आणि हार्बरवर सकाळी १०.३० ते दुपारी ३ या वेळेत आहे.

Central Railway Mega Block on Kurla-Vashi Road | कुर्ला-वाशी मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

कुर्ला-वाशी मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

ठाणे : कल्याण-ठाणे अप धीम्या मार्गासह हार्बरच्या कुर्ला-वाशी स्थानकांदरम्यान अप/डाऊन दोन्ही दिशांवर रविवारी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक आहे. हा ब्लॉक सकाळी ११. ३० ते दुपारी ४ आणि हार्बरवर सकाळी १०.३० ते दुपारी ३ या वेळेत आहे. मुख्य मार्गावरील लोकल ब्लॉकच्या कालावधीत अप जलद मार्गावर वळविण्यात येणार असल्याने ठाकुर्ली, कोपर, दिवा, मुंब्रा, कळवा या स्थानकांमध्ये लोकल धावणार नाहीत. त्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रवाशांना डाऊनच्या ठाणे व डोंबिवली स्थानकातून आहे त्याच तिकीट, पासावर प्रवासाची मुभा रेल्वेने दिली आहे.
हार्बरच्या कुर्ला-वाशी अप/डाऊन दोन्ही मार्गावर रविवारी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत ब्लॉक आहे. त्यामुळे या कालावधीत सीएसटीहून वाशीसाठी सुटणार्‍या आणि वाशीहून सीएसटीसाठी सुटणार्‍या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांची गैरसोय कमी व्हावी, यासाठी सीएसटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल या मार्गावर विशेष लोकल चालविण्यात येणार असल्याचे जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Central Railway Mega Block on Kurla-Vashi Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.