मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प
By Admin | Updated: August 5, 2016 12:33 IST2016-08-05T12:02:42+5:302016-08-05T12:33:49+5:30
सकाळपासून कोसळणा-या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची त्रेधा उडाली असून मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - सकाळपासून कोसळणा-या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची त्रेधा उडाली असून मध्य रेल्वेची वाहूतक ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेच्या कुर्ला ते दादर स्थानकादरम्यान रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून स्लो ट्रॅकवरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. कुर्ला स्थानकाजवळ लोकलची एकामागोमाग रांग लागली असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
त्यामुळे सीएसटीच्या दिेशेने जाणारी स्लो ट्रॅकवरील वाहतूक ठप्प झाली असून कोणतीही लोकल मुंबईच्या दिशेने रवाना होणार नसल्याची उद्घोषणा रेल्वे स्थानकांवर करण्यात येत आहे. तसेच सीएसटीहूनही कल्याणच्या दिशेने कोणतीही रेल्वे येत नसून स्लो ट्रॅकवरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. पावसामुळे अनेक प्रवासी लोकलमध्ये अडकले असून गाड्या व रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.
Reports of 4inch high water level over tracks at SION station , @Central_Railway trains delayed
— CPRO Central Railway (@Narendra_IRTS) August 5, 2016
Up slow line affected due waterlogging at Sion station @Central_Railway since 11;30, water level 4 inch above rail level
— CPRO Central Railway (@Narendra_IRTS) August 5, 2016
Due to heavy rain and waterlogging between Sion and Kurla suburban services badly affected @Central_Railway , water level 6 inch above rails
— CPRO Central Railway (@Narendra_IRTS) August 5, 2016