कल्याणजवळ ट्रेन घसरल्याने मध्य रेल्वे विस्कळीत
By Admin | Updated: June 30, 2017 16:21 IST2017-06-30T15:16:01+5:302017-06-30T16:21:37+5:30
कल्याण रेल्वे स्टेशनजवळ मंगला एक्सप्रेसचे डब्बे रुळावरुन घसरल्याने मध्य रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

कल्याणजवळ ट्रेन घसरल्याने मध्य रेल्वे विस्कळीत
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 30 - कल्याण रेल्वे स्टेशनजवळ मंगला एक्सप्रेसचे डब्बे रुळावरुन घसरल्याने मध्य रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याणच्यापुढे अंबरनाथ, बदलापूर आणि कर्जत येथे वाहतूक बंद झाली आहे.
मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूकही ठप्प झाली असून, अनेक प्रवासी ट्रेनमध्ये अडकून पडले आहेत. रेल्वे स्थानकातही गर्दी आहे. पुढचे तीन तास वाहतूक बंद रहाणार असल्याची माहिती आहे.