कुत्रा लोकल ट्रेनच्या पेंटाग्राफवर पडल्याने मध्य रेल्वे विस्कळीत
By Admin | Updated: July 13, 2016 08:31 IST2016-07-13T08:04:04+5:302016-07-13T08:31:43+5:30
कल्याण पत्री पुलावरून एक कुत्रा लोकल ट्रेनच्या पेंटाग्राफवर पडल्याने मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

कुत्रा लोकल ट्रेनच्या पेंटाग्राफवर पडल्याने मध्य रेल्वे विस्कळीत
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - कल्याण पत्री पुलावरून एक कुत्रा लोकल ट्रेनच्या पेंटाग्राफवर पडल्याने मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. जवळपास पंधरा ते वीस मिनिट गाडया उशिराने धावत आहेत. त्यामुळे सकाळी कार्यालय गाठण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतुकीला याचा फटका बसला आहे. सकाळी ७.३५ वाजता कल्याण पत्री पुलावरून एक कुत्रा लोकल ट्रेनच्या पेंटाग्राफवर पडला. त्यामुळे पेंटाग्राफमध्ये स्पार्क होऊन गाडी थांबली होती. रेल्वे कर्मचा-यांनी १० मिनटातच त्या कुत्र्याला बाहेर काढल्यानंतर वाहतूक सुरु झाली.
मात्र आता गाडया १५ ते २० मिनटं गाड्या उशिराने धावत आहेत. कल्याण, डोंबिवली स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. रविवारीच कळवा-मुंब्र्या दरम्यान पारसिक बोगद्याजवळ लोकलची कपलिंग तुटल्यामुळे मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.