ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचा खोळंबा; हार्बरही विस्कळीत
By Admin | Updated: February 12, 2015 05:48 IST2015-02-12T05:48:32+5:302015-02-12T05:48:32+5:30
मध्य रेल्वेवर बुधवारी खोळंबा उडाला. माटुंगा स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत रात्रीच्या सुमारास बिघाड झाल्याने कामावरुन घरी परतणा-या चाकरमान्यांना मनस्तापाचा सामना करावा लागला

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचा खोळंबा; हार्बरही विस्कळीत
मुंबई : मध्य रेल्वेवर बुधवारी खोळंबा उडाला. माटुंगा स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत रात्रीच्या सुमारास बिघाड झाल्याने कामावरुन घरी परतणा-या चाकरमान्यांना मनस्तापाचा सामना करावा लागला. तर त्याचवेळी मानखुर्द दरम्यानही सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर प्रवाशांनाही फटका बसला.
रात्री पावणे आठच्या सुमारास माटुंगा ते कुर्ला दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. या बिघाड होताच कल्याण, डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांचा खोळंबा होण्यास सुरुवात झाली. सिग्नल यंत्रणेतील बिघाड पंधरा मिनिटांत दुरुस्त केल्यानंतर डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा पुर्ववत करण्यात आली. हार्बर मार्गावर वाशी ते मानखुर्द दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आणि हार्बरचाही खोळंबा उडाला.