हार्बर पाठोपाठ मध्य रेल्वेही विस्कळीत

By Admin | Updated: May 12, 2017 21:00 IST2017-05-12T20:35:40+5:302017-05-12T21:00:00+5:30

मानखूर्द-चेंबूर दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने हार्बर रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Central Railway also disrupted the harbor | हार्बर पाठोपाठ मध्य रेल्वेही विस्कळीत

हार्बर पाठोपाठ मध्य रेल्वेही विस्कळीत

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 12 - ऐन गर्दीच्यावेळी सकाळी किंवा संध्याकाळी उपनगरीय लोकल सेवा कोलमडत असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. अशा घटना कमी होण्याऐवजी दिवसागणिक उलट वाढतच चालल्या आहेत. शुक्रवारी संध्याकाळी हार्बर पाठोपाठ मध्य रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली. 
 
मानखूर्द-चेंबूर रेल्वे स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने हार्बर रेल्वे विस्कळीत झाली आहे. मध्यरेल्वे मार्गावर घाटकोपरहून ठाण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प आहे. हार्बर मार्गावर गाडया 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. प्रवाशांच्या कामावरुन घरी परतण्याच्यावेळी हा बिघाड झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. मानखूर्द-चेंबूर दरम्यान बिघाड झाल्याने लोकल खोळंबल्या आहेत. रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची गर्दी वाढत चालली आहे. 
 
कधी रेल्वे रुळाला तडा, कधी ओव्हहेड वायर तुटणे तर, कधी सिंग्नल यंत्रणेतील बिघाड यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. बहुतांशवेळा हा बिघाड सकाळच्यावेळी होतो. त्यामुळे घरातून वेळेत बाहेर पडूनही प्रवाशांना वेळेत कार्यालय गाठता येत नाही. 
 
 

Web Title: Central Railway also disrupted the harbor