शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

'समीर यांच्या केसालाही धक्का लागणार नाही'; वानखेडे कुटुंबासाठी ढाल बनून समोर आले रामदास आठवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 23:35 IST

रिपब्लिकन पार्टी वानखेडे यांच्या पाठिशी आहे. आम्ही समीर वानखेडे यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही.

मुंबई - मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (sameer wankhede) हे क्रुझ ड्रग्स प्रकरण समोर आल्यापासूनच चर्चेत आहे. या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह काही लोकांना अटक करण्यात आली होती. यानंतर, महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने नवनवे आरोप करत आहेत. मलिक यांनी नुकताच दावा केला होता, की समीर वानखेडे दलित नसून मुस्लीम आहेत आणि त्यांनी सरकारी नोकरी मिळविण्यासाठी बनावट प्रमाणपत्र सादर केले आहे. यानंतर आता थेट केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) हे समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या समर्थनार्थ समोर आले आहेत. (Ramdas Athawale came in support of sameer wankhede)

आठवले म्हणाले, "मी समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांच्या पाठिशी आहे. ते बाबासाहेबांचे अनुयायी असून दलित आहेत, ते मुस्लीम नाहीत. समीर यांच्या वडिलांचे नाव दाऊद नसून ज्ञानदेवच आहे. त्यांना माझा आणि माझ्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. ज्ञानदेव यांनी मला त्यांचे सर्व कागदपत्रं दाखवले असून नवाब मलिकांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत. त्यांचा जावई ड्रग्स प्रकरणात आठ महिने तुरुंगात होता. यामुळेच ते जाणीवपूर्वक, असे आरोप करत आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदाचा गैरवापर करत आहेत. हे चुकीचे आहे." 

एवढेच नाही, तर "मी मलिक यांना सांगू इच्छितो, की त्यांनी वानखेडे कुटुंबाला बदनाम करम्याचे षडयंत्र थांबवावे. रिपब्लिकन पार्टी वानखेडे यांच्या पाठिशी असून समीर वानखेडे यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. याप्रकरणी माझा आणि माझ्या पक्षाचा वानखेडे कुटुंबीयांना पूर्ण पाठींबा आहे," असेही आठवले यांनी यावेळी म्हटले आहे. आज समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर आणि वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे यांनी आठवले यांची भेट घेतली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मग मुसलमानावर आरोप का करत आहात?"मी नवाब मलिक यांना सांगू इच्छितो, की त्यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबाची बदनामी करणे थांबवावे. जर ते म्हणत असतील, की समीर मुस्लीम आहेत, तर मग मुसलमानावर आरोप का करत आहात." आठवले म्हणाले, रिपब्लिकन पार्टी समीर वानखेडे यांच्यासोबत उभी आहे. समीर यांना कसल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेKranti Redkarक्रांती रेडकरSameer Wankhedeसमीर वानखेडेnawab malikनवाब मलिक