शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पुरोगामी, दलित, आंबेडकरवादी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा केंद्र सरकारचा डाव! बाळासाहेब थोरातांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 16:16 IST

Balasaheb Thorat : एकूण सर्व परिस्थिती पाहता संशयाला जागा असून देशभरातून यावर चिंता व्यक्त केली जात आहे

ठळक मुद्दे‘एल्गार’चा तपास एनआयएकडे देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय काळजी वाढवणारापुरोगामी, दलित, आंबेडकरीवादी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा केंद्र सरकारचा डाव एल्गारचे व्यासपीठ पुरोगामी विचारांचे होते. तिथे कवी, साहित्यिक, विचारवंत यांनी आपले विचार मांडले

मुंबई - एल्गार परिषदेचा तपास केंद्र सरकारने ज्या घाई गडबडीने एनआयएकडे दिला, त्यावरून हा निर्णय काळजी वाढवणारा आहे. पुरोगामी, दलित, आंबेडकरीवादी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचे यातून स्पष्ट दिसत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.एल्गारच्या तपासावर बोलताना थोरात पुढे म्हणाले की, हे व्यासपीठ पुरोगामी विचारांचे होते. तिथे कवी, साहित्यिक, विचारवंत यांनी आपले विचार मांडले. सत्ताधारी पक्षाच्या विचारधारेविरोधात विचार मांडले म्हणून त्यांच्यावर करावाई करणे चुकीचे आहे. हा पुरोगामी, आंबेडकरवादी विचार दाबण्याचा प्रयत्न आहे. कोणी काही वेगळे वागले असेल, कोणाविरोधात काही पुरावे असतील तर आम्ही त्यांचे समर्थन करत नाही. परंतु एकूणच या प्रकरणाचा तपास ज्यापद्धतीने एनआयएकडे देण्यात आला त्याचा वेळ, काळ पाहिला तर सर्वच संशायस्पद वाटते.

याआधी पुरोगामी विचारांच्या दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे यांच्या हत्या करून त्यांचे विचार संपवण्याचा प्रयत्न झाला. आता केंद्रातील भाजप सरकार पुरोगामी, आंबेडकरवादी विचार मांडणा-या ‘एल्गार’वर कारवाई करुन या विचारांना नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. एकूण सर्व परिस्थिती पाहता संशयाला जागा असून देशभरातून यावर चिंता व्यक्त केली जात आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

संबंधित बातम्या 

भिमा कोरेगाव प्रकरणाचा तपास हा राज्य शासनाकडेच असावा - बाळासाहेब थोरात

'सत्ता गेल्याने भाजपचे नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत'

फडणवीसांनी चांगला ज्योतिषी शोधावा: बाळासाहेब थोरात

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसPoliticsराजकारण