शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'राज्याची परवानगी न घेताच कोरेगाव भीमाचा तपास एनआयएकडे' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 23:04 IST

गृहमंत्री अनिल देशमुखांकडून केंद्राच्या भूमिकेचा केला निषेध 

गोंदिया: कोरेगाव भीमा येथील प्रकरणाचा तपास राज्य सरकार करत होते. मात्र आज अचानक केंद्र सरकारने राज्य सरकारची पूर्व परवानगी न घेता या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) दिला. हा प्रकार अत्यंत निंदनीय नसून आपण या प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी गोंदिया येथे सांगितले. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे शुक्रवारी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. ते दिवसभर गोंदिया येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत व्यस्त होते. दरम्यान रात्री ९.३० वाजताच्या सुमारास त्यांना कोरेगाव भीमा येथील प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने एएनआयकडे दिल्याची माहिती मिळाली. याबद्दल देशमुख यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. केंद्र सरकारने कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास राज्य सरकारकडून काढून एनआयएकडे देण्याची भूमिका संशयास्पद आहे. एखाद्या प्रकरणाचा तपास राज्य सरकार करत असताना त्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश एनआयएला देताना केंद्र सरकारला राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते. मात्र केंद्र सरकारने तशी परवानगी न घेता परस्पर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला. हा प्रकार अतिशय निंदनीय असल्याचे गृहमंत्री देशमुख म्हणाले. विशेष म्हणजे कोरेगाव भीमा प्रकरण अत्यंत संवेदनशील असून या प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्याने राज्य सरकार करत होते. मात्र असे असताना केंद्राने घेतलेल्या भूमिकेचे आश्चर्य वाटत असल्याचे देशमुख यांनी सांगितले. 

केंद्र सरकारचे सुडाचे राजकारण केंद्र सरकारने माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानाची झेड सुरक्षा काढून घेतली. पवार यांनी केंद्रात अनेक महत्त्वपूर्ण मंत्रिपदांवर काम केले आहे. असे असताना केंद्र सरकारने केवळ सुडाच्या भावनेतून त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानाची सुरक्षा कपात केल्याचा आरोपही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. 

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारAnil Deshmukhअनिल देशमुखSharad Pawarशरद पवार