"केंद्र सरकारने गरिबांना कोरोना लस मोफत द्यावी"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 05:37 AM2021-01-03T05:37:39+5:302021-01-03T05:38:03+5:30

Crorona Vaccine: राजेश टोपे : चारही जिल्ह्यांत लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वी

The central government should provide free corona vaccine to the poor | "केंद्र सरकारने गरिबांना कोरोना लस मोफत द्यावी"

"केंद्र सरकारने गरिबांना कोरोना लस मोफत द्यावी"

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कोरोना लसीकरणासाठी राज्य सज्ज आहे. त्या अनुषंगाने राज्यात लसीकरणाचे ड्राय रन घेतले जात आहे. देशातील एका कंपनीची लस तयार असून, लवकरच लसीकरणाला सुरुवात होईल, केंद्र सरकारने गरिबांना  लस मोफत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तथापि, ती न दिल्यास राज्य सरकार गरिबांना लसीपासून वंचित ठेवणार नाही, अशी ग्वाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

 
शनिवारी जालना जिल्ह्यातील तीन केंद्रांवर लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली. जालना शहरातील शासकीय रुग्णालयातील केंद्राला आरोग्यमंत्री टोपे यांनी भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते.
टोपे म्हणाले, देशात आठ कंपन्यांमार्फत कोरोनाची लस तयार केली जात आहे. यात सीरम व भारत बायो इंटरनॅशनल लिमिटेड हैदराबाद या कंपन्यांनी तिसरा टप्पा पूर्ण केला आहे. इतर कंपन्या दुसऱ्या टप्प्यात आहेत. तिसरा टप्पा पूर्ण झालेल्या एका कंपनीची लस पूर्णपणे तयार आहे. ही लस 
देण्यासाठी राज्य सरकार तयार असून, त्यासाठी ड्रग अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या परवानगीची गरज आहे. ही परवानगी मिळाल्यास, प्रशासन लसीकरणासाठी सज्ज असल्याचेही टोपे यांनी सांगितले.

लसीकरणासाठी राज्य शासन सज्ज
n लसीकरण केंद्रावर गेल्यावर प्रथम पोलीस आपले ओळखपत्र तपासून आत सोडतील. पोलिसांना ओळखपत्र दाखविल्यानंतर संबंधित व्यक्ती आयडेंटिफिकेशन रूममध्ये जाईल. 
n तिथे शिक्षक असतील. ज्यांना लसीकरणासाठी मेसेज पाठविण्यात आला आहे, तीच व्यक्ती केंद्रावर आली आहे का, याची पडताळणी ते को-विन अ‍ॅपच्या माध्यमातून करतील. 
n पडताळणी झाल्यानंतर लसीकरण करण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक केंद्रावर दोन किंवा तीन प्रशिक्षित नर्स असतील, असे टोपे म्हणाले.

लाेकसंख्येचे तीन प्राधान्य गट
n लसीकरणाच्या प्रक्रियेत लस व्यवस्थापनाची महत्त्वाची भूमिका असल्यामुळे, प्रशिक्षकांना, तसेच विविध राज्यांत लस वितरणाचे व्यवस्थापन करणाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 
n केंद्र शासनाने याकरिता लोकसंख्येचे तीन प्राधान्य गट केले आहेत. त्यात आरोग्यसेवा कर्मचारी साधारणतः एक कोटी, फ्रंटलाइन वर्कर्स साधारणपणे दोन कोटी, प्राधान्य वयोगट साधारणतः २७ कोटी असे गट प्राधान्याने लसीकरणासाठी केले जातील.
n वैद्यकीय अधिकारी, लस देणारे, लस देणाऱ्यांची पर्यायी फळी, कोल्ड चेन हाताळणी करणारे, सुपरवायझर, डेटा व्यवस्थापक, आशा समन्वयक आदींचे प्रशिक्षण सत्रे घेण्यात येतील.

चारही जिल्ह्यांत ड्राय रन यशस्वी
n पुणे जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय औध, प्राथमिक आरोग्य केंद्र माण, पिंपरी चिंचवड महापालिकेतील जिजामाता आरोग्य केंद्र.
n नंदूरबार जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय नंदूरबार, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टी आणि उपजिल्हा रुग्णालय नवापूर तर जालना जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय अंबड, प्राथमिक आरोग्य केंद्र शेळगाव.
n नागपूर जिल्ह्यात डागा मेमोरियल हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय कामठी आणि नागपूर महापालिकेतील के.टी.नगरचे शहरी आरोग्य केंद्र याठिकाणी ड्राय रन घेण्यात आला. या चारही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व मनपा आरोग्य अधिकारी यांनी भेटी देऊन संनियंत्रण केले.
 

Web Title: The central government should provide free corona vaccine to the poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.