शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी केंद्र सरकार सरसावले, डेहराडूनमध्ये संशोधन कार्यशाळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 18:52 IST

ग्रामीण भागात जंगली श्वापदे आणि मानव यांच्यात सातत्याने संघर्ष होत आहेत. परिणामी केंद्र सरकारच्या पुढाकाराने जंगल, वन्यजिवांसह मनुष्यदेखील सुरक्षित असावे, यासाठी उपाययोजना केल्या जातील.

- गणेश वासनिक

अमरावती : ग्रामीण भागात जंगली श्वापदे आणि मानव यांच्यात सातत्याने संघर्ष होत आहेत. परिणामी केंद्र सरकारच्या पुढाकाराने जंगल, वन्यजिवांसह मनुष्यदेखील सुरक्षित असावे, यासाठी उपाययोजना केल्या जातील. राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या नियंत्रणात डेहराडून येथे १९ व २० सप्टेंबर रोजी तज्ज्ञांची संशोधन कार्यशाळा होणार आहे.वाघ, बिबट्याची वाढत असलेली संख्या ही राज्याच्या वनविभागासाठी आनंददायी आहे. परंतु, जंगली श्वापदांचा अधिवासच मानवाने नष्ट केल्यामुळे ग्रामीण भागात मानव-वन्यजीव संघर्ष ही मोठी समस्या उभी झाली आहे. वाघांचे अधिवास सुरक्षित ठेवताना जंगलाचे संरक्षणदेखील महत्त्वाचे आहे. विदर्भात पाच व्याघ्र प्रकल्प असले तरी या व्याघ्र प्रकल्पांव्यतिरिक्त जंगलातसुद्धा वाघांचे वास्तव्य असल्याचे अधोरेखित आहे. त्यामुळे वाघांचे कॉरिडॉर सुरक्षित ठेवण्यासाठी वार्षिक संशोधन कार्यशाळेत मंथन केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या वने व पर्यावरण मंत्रालयाच्या पुढाकाराने देशभरातील तज्ज्ञ वार्षिक संशोधन कार्यशाळेत उपस्थिती दर्शविणार आहेत. राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण, वनविभाग आणि डेहराडून येथील वन्यजीव विभागाकडे कार्यशाळेचे नियंत्रण असणार आहे. राज्यात मार्च २०१८ अखेर १२ बिबट्यांची अवैधरित्या शिकार झाली असून, डब्ल्यूपीएसआयच्या अभ्यासातून ही आकडेवारी समोर आली आहे. प्राणी, वृक्षसंवर्धन याविषयी समाजात जनजागृती करण्याचे काम डब्ल्यूपीएसआय ही संस्था करते. या संस्थेने जानेवारी ते मार्च २०१८ दरम्यान केलेल्या सर्वेक्षणानुसार बिबट्यांचा आढावा घेतला. यात उत्तराखंडमध्ये सर्वाधिक ३६ बिबटे मृत्युमुखी पडले. या आकडेवारीत महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर असून, ३१ बिबटे मृत्युमूखी पडले आहेत. अवैधरित्या शिकार करून मारलेल्या बिबट्यांची संख्या महाराष्ट्रात १२ आहे. वाघ, बिबट या हिंस्त्र प्राण्यांच्या दिवसेदिवस मानवी परिसरात वाढत असलेला वावर धोकादायक ठरत आहे. परिणामी केंद्र सरकारने मानव-वन्यजीव संघर्ष टाळणे, जंगलावर मानवाने अवलंबून न राहता उपजीविकेचे साधन निर्माण करणे, वन्यप्राण्यांसह मनुष्याचे जीवाचे संरक्षण आदी विषयावर संशोधन कार्यशाळेत तज्ञ्ज मते नोंदविणार असून, त्याअनुषंगाने उपाययोजना के ल्या जातील.

२२ हजार चौरस कि.मी. जंगल संरक्षणाचा कृतिआराखडाविदर्भात मेळघाट वगळता नागझिरा, पेंच, ताडोबा, बोर व टिपेश्वर हे पाच व्याघ्र प्रकल्प आहेत. यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली असे एकूण सात जिल्हे मिळून २२ हजार चौरस कि.मी. लांब असलेले जंगल संरक्षणासाठी कृतीआराखडा तयार केला जाणार आहे. वाघांचे कॉरिडॉर सुरक्षित ठेवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी वनविभागाला सांभाळावी लागणार आहे, शिवाय मानव- वन्यप्राणी संघर्ष होता कामा नये, ही खबरदारी घ्यावी लागेल. 

जंगली श्वापदांचे मणुष्यांवर होणारे जीवघेणी हल्ले हे गंभीर आहेत. मात्र, जंगल असेल, तर वन्यप्राणी जगतील. त्यामुळे जंगल, वन्यप्राण्यांसह मनुष्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना केला जात आहे. डेहरादून येथील संशोधन कार्यशाळेत या विषयावर शिक्कामोर्तब होईल.        - सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र.

टॅग्स :Tigerवाघwildlifeवन्यजीव